गायीच्या ममतेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भूकेल्या श्वानाच्या पिलांना गायीनं स्तनपान केल्याचा हा व्हिडीओ सर्वांचं मन जिंकत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक सकारात्मक कमेंट केल्या असून पसंती दर्शवली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, गाय झोपलेली असून श्वानाची चार पिल्ली स्तनपान करत आहेत.
Mothers are angels
Don’t differentiate among its kids,
Nor among the children of god.. pic.twitter.com/snQvmCNiWn— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 23, 2020
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला इंडियन फॉरेस्ट सर्विसचे आधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडीओला छान असं कॅप्शनही दिलं आहे. ‘आई स्वर्गदूत आहे. आपल्या आणि ईश्वराच्या बाळात ती कोणतेही अंतर ठेवत नाही.’
इंडियन फॉरेस्ट सर्विसचे आधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ २३ जुलै रोजी ट्विटरवर पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन हजार पेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. तर ६०० पेक्षा जास्त जणांनी लाइक्स आणि १२० पेक्षा जास्त जणांनी रिट्विट आणि कमेंट केल्या आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.
