Crab Video Viral : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असलेला एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये पावसाळ्यात हिंदी महासागरातून ‘राक्षसी खेकडे’ बाहेर पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे खेकडे समुद्रातून बाहेर पडून काठाच्या दिशेने येत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. पण खरंच अशा प्रकारचे राक्षसी खेकडे हिंदी महासागरातून बाहेर पडत असल्याचा केला जाणारा दावा खरा आहे का याविषयी जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर news.hook ने त्यांच्या प्रोफाइलवर दिशाभूल करणार्‍या दाव्यासह व्हायरल व्हिडीओ शेअर केला.

इतर युजर्सही समान दाव्यांसह तोच व्हिडीओ शेअर करीत आहेत.

अर्काइव्ह व्हर्जन: https://archive.ph/UmdFX

तपासातून काय समोर आलं?

आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला.

आम्हाला असे आढळले की, हा व्हिडीओ एक वर्षापूर्वी टिकटॉक या सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता.

आम्हाला एक वर्षापूर्वी रेडिटवर केलेली एक पोस्टही आढळली.

Giant Crabs on the Stairs
byu/SimpleButFun inoddlyterrifying

या पोस्टवरील एका कमेंटमध्ये ही खेकड्यांचे शिल्पे असल्याचे नमूद केले होते.

या माहितीवरून आम्ही गूगल कीवर्ड सर्च केला. आम्हाला पिंटरेस्टवर सेम असाच एक फोटो आढळला. ज्यामध्ये असे म्हटले होते की, या फोटोत यांगत्झे नदीकिनारील पादचारी रस्त्यावरील खेकडे, कास्य पुतळा, वुहू.

पुन्हा गूगल सर्चद्वारे आम्हाला ‘चिनी खेकड्यांच्या संस्कृतीचा अर्थ : साहित्य, कला व आहार यांच्या दृष्टिकोनातून एक सर्वसमावेशक पुनरावलोकन’ नावाचा एक शोधनिबंध आढळला.

https://www.researchgate.net/publication/391122450_The_connotation_of_Chinese_crab_culture_a_comprehensive_review_from_the_perspectives_of_literature_art_and_diet

या शोधनिबंधात आम्हाला एक समान फोटो आढळला.

https://www.researchgate.net/figure/A-Crab-sculpture-in-Wuhu-Riverside-Park-Wuhu-City-China-B-Crab-sculpture-on-the_fig5_391122450

या फोटोचे शीर्षक होते : वुहू रिव्हरसाईड पार्क, वुहू शहर, चीनमधील खेकड्यांचे शिल्प.

या शोधनिबंधात असेही नमूद केले होते : वुहू रिव्हरसाईड पार्क (वुहू शहर, चीन)मध्ये खेकड्यांची अनेक शिल्पे (आकृती 5A) आहेत, जी संगमरवरी पायऱ्यांवर चढतात, गंभीर हावभाव करीत ती धुमाकूळ घालतात.

तसेच, व्हिडीओमध्ये खेकडे अजिबात कोणतीही हालचाल करताना दिसत नाहीत. व्हिडीओमधून मिळालेल्या एका कीफ्रेममध्ये, आम्हाला खेकडा एका धातूच्या रॉडने बसवलेला दिसला.

निष्कर्ष :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनच्या वुहू शहरातील वुहू रिव्हरसाईड पार्कमधील समुद्रकिनाऱ्यावरील खेकड्यांच्या शिल्पांचा व्हिडृीओ हिंदी महासागरातून राक्षसी खेडके बाहेर पडत असल्याचा खोटा दावा करीत मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.