Employees Dance To Welcome Foreign Cilent Video : सध्या सोशल मीडियावर एका ऑफिसमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात ऑफिसमधील कर्मचारी चक्क धमाकेदार नृत्य सादर करून विदेशी क्लायंटचे स्वागत करताना दिसतायत. कर्मचाऱ्यांचा या डान्स व्हिडीओवर सध्या लोक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यात अनेकांनी कर्मचाऱ्यांच्या या वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
व्हिडीओमध्ये एका ऑफिसमधील संपूर्ण टीम किल्ली किल्ली या तेलुगू गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. त्यानंतर एक कर्मचारी लोकप्रिय बॉलीवूड ट्रॅक मैं तेरा बॉयफ्रेंड गाण्यावर सोलो परफॉर्म करतो. हे सगळं पाहून विदेशी क्लायंटदेखील खूप इम्प्रेस होतो आणि तोही त्यांना नाचून दाद देतो. हसून तोही त्यांच्यासह नाचू लागतो. पण, या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ऑफिसमधील हा व्हिडीओ @WokePandemic या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करीत कॅप्शनमध्ये म्हटलेय की, भारताने कॉर्पोरेट ऑफिसेसचे अशा पद्धतीने छपरीकरण थांबवावे. एखाद्या ऑफिसमध्ये भारतीय मुली नाचत आहेत आणि परदेशी क्लायंटचे स्वागत करत आहेत. तसेच क्लायंटलाही नाचण्यास भाग पाडले जात आहे हे देशाची प्रतिमा खराब करणारे आहे. या व्हिडीओमुळे भारतातील कर्मचारी आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीची चुकीची छाप इतर देशांवर पडेल, अशी प्रतिक्रियादेखील काहींनी व्यक्त केली आहे.
दरम्यान या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्येही युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स म्हणत आहेत की, हा टीम बिल्डिंगचा प्रकार आहे; पण त्याचविरोधात काही लोक ऑफिसमधील हे फार अनौपचारिक वागणे असल्याचे म्हणत आहेत.
काहींनी ही फार लाजिरवाणी आणि वाईट स्थिती असल्याचे म्हटलेय. तर काही अशा प्रकारच्या ऑफिसमध्ये नाचणे आणि हे दृश्य पाहणे खूपच वाईट आहे, असे म्हटलेय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे त्याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.