एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात सीएसकेने विजय मिळवत इतिहास रचला आहे. संपूर्ण क्रिडाविश्वात नंबर वन कर्णधार म्हणून ठसा उमटवलेल्या एम एस धोनीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. पण चेन्नई सुपर किंग्जला समर्थन देणाऱ्या चाहत्यांचा नादच खुळा आहे. देशभरात ज्या ठिकाणी सामना असेल त्या मैदानात धोनी पोहोचण्याच्या आधी पिवळ्या जर्सीतील धोनीचे हे चाहते आधीच पोहोचलेले असतात. कालही धोनी धोनीच्या घोषणा देऊन या चाहत्यांनी आयपीएलचा संपूर्ण हंगामच एकप्रकारे धोनीचा असल्याचं चित्र निर्माण केलं. दरम्यान आयपीएलच्या यंदाच्या हंगामाच्या काळात स्विगीवरून वेगवेगळे फूड प्रेक्षकांनी मागवले होते. यामध्ये सर्वाधिक मागवलेल्या डीशमध्ये बिर्याणीचा क्रमांक आलाय. तसेच मोठ्याप्रमाणात कंडोमही मागवण्यात आले. विशेष म्हणजे स्विगीने याची यादी ट्विटरवर शेअर केली आहे.
आजकाल लोक ग्रोसरी सर्व्हिस प्लॅटफॉर्मद्वारे मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन गोष्टी विकत घेत आहेत. भाज्यांपासून ते अंडी-चिकनपर्यंत, कंडोम पासून ते सॅनिटरी नॅपकिनपर्यंत सर्व काही ऑनलाइन खरेदी केले जात आहे. यामध्ये स्विगी इंस्टामार्टची लोकप्रियता वाढली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात स्विगीने त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे झालेल्या कंडोमच्या विक्रीबद्दल माहिती दिली आहे. स्विगीने म्हटले आहे की, ‘स्विगी इंस्टामार्टद्वारे आतापर्यंत २,४२३ कंडोम वितरित केले गेले आहेत.
पाहा पोस्ट –
स्विगीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून हे ट्विट केले आहेत. यावर नेटकरीही भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. सध्या स्विगीचे हे ट्विट्स चर्चेचा विषय ठरला आहे.