तामिळनाडूच्या डिंडीगुल येथील एका रोजंदारी करणाऱ्या मजुराच्या मुलीने बारावीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० म्हणजेच सर्व विषयात पूर्ण गुण मिळवले आहेत. या मुलीला परीक्षेत मिळालेले गुण पाहून तिच्या आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या मुलीचं नाव नंदिनी असं आहे. ती सरवन कुमार या गरीब मजुराची मुलगी आहे. नंदीनीने अन्नामलैयार गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. सोमवारी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच नंदिनीने सर्व विषयांत ६००/६०० गुण मिळवून तिच्या शिक्षकांसह आपल्या पालकांची मान अभिमानाने उंच केली आहे.

नंदिनी सांगितलं यशाचं सिक्रेट –

हेही पाहा- आधीच दारुची नशा त्यात GPS मुळे चुकली दिशा; २ महिला कारसह थेट समुद्रात गेल्याचा मजेशीर Video व्हायरल

बारावीच्या बोर्डात पैकीच्या पैकी गुण मिळवल्यानंतर नंदिनीने आपल्या यशाचं रहस्य सांगितलं आहे. ती म्हणाली, ‘मला या यशावर विश्वास बसत नाहीये, मला या गोष्टीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी माझे पालक आणि नातेवाईकांसह शाळेतील शिक्षक जबाबदार आहेत. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानते. तसेच माझ्या पालकांचा पाठिंबा आणि मला अभ्यासासाठी वेळ देणे हेच माझ्या यशाचे कारण आहे.” नंदिनीने सांगितले की, ती दररोज ८ ते ९ तास अभ्यास करायची, त्यामुळेच ती सर्व विषयांमध्ये चांगले गुण मिळवू शकली.

हेही पाहा- धावपट्टीवरील विमानाने अचानक पेट घेतला अन्…, जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या प्रवाशांचा Video व्हायरल

शिक्षण मंत्री म्हणाले….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे शिक्षण मंत्री अनबिल महेश यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, यावर्षी मुलांचे पास होण्याची प्रमाण ०.२७ टक्क्यांनी वाढल्यामुळे मला आनंद झाला आहे. तसेच शिक्षणमंत्र्यांनी मुलांची हिंमत वाढवण्याची विनंती देखील पालकांना केली आहे. ते म्हणाले, “ज्यांना ३५ गुण मिळाले आहेत आणि ज्याला १०० गुण मिळाले ती दोन्हीही आमची मुले आहेत. मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा. सीएम स्टॅलिन यांनी ‘नान मुधलवन’ योजना सुरू केली आहे ज्याद्वारे आपण मुलांमधील टॅलेंट ओळखू शकतो. शालेय शिक्षण मंत्री आणि दोन मुलांचा पिता या नात्याने मी पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रतिभेचे कौतुक करायला सांगतो, मग त्यांना कितीही गुण मिळालेले असोत.” दरम्यान, नंदिनीला मिळालेल्या गुणांचे कौतुक अनेकजण करत असून तिच्या या यशाची बातमी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.