Snake Viral Video: सोशल मीडियामुळे आपण जगभरातील कोणतेही व्हिडीओ अगदी सहज पाहू शकतो. सोशल मीडियावर सतत कोणते ना कोणते नवनवीन व्हिडीओ व्हायरल होतच असतात; ज्यात कधी मजेशीर, तर कधी थरकाप उडविणारे व्हिडीओ असतात. काही दिवसांपासून असेच काही सापांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये साप कधी गाडीच्या चाकात अडकलेला दिसतो, तर कधी बुटाच्या आत दिसतो. असले थरकाप उडविणारे व्हिडीओ पाहिल्यावर कोणाच्याही अंगावर सहजपणे काटा येतो.

नुकताच सापाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात साप चक्क एका टॉयलेटमधून बाहेर निघाल्याचे दिसत आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून, एका व्यक्तीला टॉयलेटमध्ये गेल्यावर अचानक सापाच्या फुसफुसण्याचा आवाज आला. त्यावेळी त्याने टॉयलेटच्या आत पाहिले, तर त्याला तिथे साप असल्याचा अंदाज आला. त्यावेळी त्याने तत्काळ सर्पमित्राला फोन लावून बोलावले.

हा व्हायरल व्हिडीओ सर्पमित्र असलेल्या शीतल कासारने तिच्या इन्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, साप हळूहळू टॉयलेटमधून बाहेर येत आहे. तो पूर्ण बाहेर येताच त्याची लांबी पाहून सर्व जण आश्चर्यचकित होतात. त्यानंतर सर्पमित्र शीतलने पटकन सापाला आपल्याला हातात पकडले आणि त्याला घेऊन ती घराबाहेर पडली. हा व्हिडीओ शेअर करीत शीतलने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा साप धामण जातीचा असून, तो बिनविषारी आहे. तसेच या सापाची लांबी ९-१० फूट असून, तो प्रामुख्याने उंदराची बिळे, मनुष्य वस्तीत आढळतो.”

हेही वाचा: नागीण चवताळली! अंड्यांचे रक्षण करतानाचा VIDEO होतोय व्हायरल; पाहून अंगावर येईल काटा..

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, या व्हिडीओला आतापर्यंत ९५ हजाराहून अधिक व्ह्युज व एक हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “साप चक्क टॉयलेटमध्ये बापरे!” तर, आणखी एकानं लिहिलंय, “खूप भयानक आहे हे.” तर, एका युजरने लिहिलंय, “मी असतो टॉयलेटमध्ये, तर माझं काय झालं असतं?” तर, काही जण शीतलच्या शौर्याचंदेखील कौतुक करताना दिसत आहेत.