Father-daughter video: ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नात वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्यातं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. आईबद्दल नेहमीच बोललं जातं मात्र पडद्यामागची भूमीका साकरणाऱ्या वडिलांकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष होतं. अशाच एका वडिलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यांनी आपल्या लेकिला मृत्यूच्या दारातून परत आणलं. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल जिथे देव पोहचू शकत नाही तिथे बाप पोहचतो.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली बेडरुममध्ये अभ्यासाच्या टेबलवर काहीतरी करत आहे. या दरम्यान अचानक ती ओरडू लागते, मुलीचा आवाज एकून वडिल धावत येतात. यावेळी मुलगी घशाला हात लावत रडताना दिसत आहे. तिच्या घशात काहीतरी अडकल्याचं वडिलांना कळतं आणि वडिल लगेच तिला जवळ घेऊन तिची पाठ थोपटतात. तिच्या घशातच अडकलेली वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळानंतर अखेर चिमुकलीच्या तोंडातून एक छोटीशी काहीतरी वस्तू बाहेर पडते आणि चिमुकली बचावते.

मुलीला काय झालंय हे वेळेत वडिलांनी कळलं नसतं तर कदाचीत मुलीचा जीव गेला असता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंगूसाशी पंगा घेणं पडलं भारी; चतूर मुंगूसाचा एकच वार आणि साप गपगार, पाहा व्हायरल VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @zona_inspirasiwanita पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. नेटकरीही हा व्हिडीओ बघून अवाक झाले आहेत. तर पालकांनी मुलांकडे व्यवस्थित लक्ष देण्याचं आवाहन नेटकरी करत आहेत.