Deepti Sharma Run Out Funny Memes: भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शनिवारी (२४ सप्टेंबर) लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १६ धावांनी विजय मिळवला. अगदी बरोबरीचा झालेला हा सामना अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगला, खरंतर सरतेशेवटीच भारताची गोलंदाज दिप्ती शर्मा हिने केलेली कमाल ही इंग्लंड विरुद्ध सामन्याची खरी शान ठरली. दिप्ती शर्माने ४४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अष्टपैलू खेळाडू शार्लोट डीनला धावबाद केले. दिप्तीने नियम पळून शार्लोटला बाद केले असले तरी हे खेळाचं ‘Spirit’ नाही म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. एकीकडे हा सर्व वाद सुरु असताना दुसरीकडे नेटकऱ्यांना मात्र मीम बनवण्यासाठी नामी संधी मिळाली आहे.

दिप्तीने शार्लोटला बाद केल्यानंतर ही इंग्लंडची खेळाडू चक्क मैदानातच रडू लागली हे बघून भारतीय क्रिकेटप्रेमींनी मीम्सचा वर्षाव सुरु केला आहे तर दिप्तीच्या कौतुकासाठीही अनेकांनी भन्नाट मजेशीर मीम्स बनवले आहेत. यापूर्वी अशाप्रकारे विकेट घेतलेल्या रविचंद्रन आश्विनचे फोटो वापरूनही अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. चला तर मग पाहुयात नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया..

Twinkle Khanna reacts on performing in Dawood Ibrahim party
ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
watch jugaad viral video
बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ

Deepti Sharma Run Out: इंग्लिश लोक इतके रडके… दिप्ती शर्माची पाठराखण करत विरेंद्र सेहवागचं खास ट्वीट

लगान का बदला लिया रे..

दरम्यान दिप्ती शर्माने काल विकेट घेतल्यावर तिच्यावर टीका सुद्धा होत आहेत, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह अन्य पुरुष खेळाडूंनी सुद्धा दिप्तीची पाठराखण केली आहे.