Viral video: भारताची राजधानी असण्यासोबतच दिल्ली गुन्हेगारीची राजधानीही बनली आहे. देशाची राजधानी दिल्ली हळूहळू गुन्हेगारी क्षेत्राची राजधानी बनत चालली आहे. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील गुन्हेगारीचा आलेख चढताच राहिला आहे. दिल्लीत रोज अनेक घटना उघडपणे घडताना दिसतात. शहरातील रस्त्यांवर धोकादायक शस्त्रे घेऊन गुंड आणि गुन्हेगार निर्भयपणे फिरताना दिसत आहेत. चोरट्यांच्या मनातून पोलिसांची भीती पूर्णपणे नाहीशी झालेली दिसते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाईकवर तीन मुले एका हातात दारूची बाटली अन् दुसऱ्या हातात कोयता घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर बिन्धास्तपणे फिरताना दिसत आहेत.

एका हातात दारूची बाटली अन् दुसऱ्या हातात कोयता

Delhis Vada Pav Girl Get Into Ugly Fight With Crowd On Streets
“ज्यानी तुला पाठवले त्याचा…”, वडापाव गर्ल पुन्हा चर्चेत! भररस्त्यात महिलेबरोबर केली मारामारी; भांडणाचा Video Viral
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये तीन जण दुचाकीस्वार हातात चाकू घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर निर्भयपणे फिरताना दिसत आहेत. एका हातात चाकू आणि दुसऱ्या हातात दारूची बॉटल धरलेले हल्लेखोर दिसत आहेत. एवढेच नाही तर हे बदमाश एकत्र येऊन गोंधळ घालताना दिसत आहेत.याआधीही दिल्लीच्या रस्त्यांवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये काही बदमाश कारच्या सनरूफमधून बाहेर पडून लोकांवर रंग फेकताना दिसत होते. यावरून दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कुठे चालली आहे हे दिसून येते.

 दरम्यान हा सगळा प्रकार एका कारमधल्या व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जे मुलांनाही जमणार नाही ते मुलीनं केलं” स्पोर्ट्स बाईकवर तरुणीचा खतरनाक स्टंट; VIDEO व्हायरल

@prerna82349124 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यांनी शेअर करताना लिहिलं आहे… “तीन मुलं बेधडकपणे दिल्लीच्या रस्त्यावर फिरत आहेत. हातात बाटल्या आणि चाकू फिरवत आहेत, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये घराबाहेर पडण्याची भीती पसरत आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत.