दिल्लीतील २९ वर्षीय जिम ट्रेनर तरुणाची वडिलांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. आपल्या पत्नीला धडा शिकविण्यासाठी वडिलांनीच मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या संदर्भात इंडिया टुडेने सविस्तर वृत्त दिले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रंगलाल (वय ५४) असे आरोपीचे नाव आहे. त्याने व्यवसायाने जिम ट्रेनर असलेल्या गौरव सिंघल या आपल्या २९ वर्षीय मुलाची ७ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास हत्या केली. आरोपीने मुलाच्या चेहरा आणि छातीवर चाकूच्या साह्याने सपासप १५ वार केले. त्याचे लग्न होण्याच्या काही तास आधीच त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरारी झाला. आता त्याला जयपूरमधून अटक करण्यात आली आहे.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

आरोपी तीन ते चार महिन्यांपासून या हत्येचा कट रचत होता. अखेर त्याने संधी साधून राहत्या घरातच मुलाची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर आरोपीला अटक करीत पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, आरोपीचे त्याची पत्नी आणि मुलाबरोबरचे नाते चांगले नव्हते, त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. तसेच पत्नी मुलाला नेहमी पाठीशी घालायची. याच गोष्टींचा राग मनात ठेवत आरोपीने पत्नीला धडा शिकविण्यासाठी मुलाच्या हत्येचा कट रचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून मुलाच्या हत्येसाठी योजना आखली होती. त्यासाठी आरोपीने तीन साथीदारांना ७५ हजार रुपयांची सुपारी दिली होती. या हत्येसाठी त्यांच्यात दीड लाखाचा सौदा ठरला होता. २२ ते २५ वयोगटातील हे तीनही साथीदार त्याच परिसरातील रहिवासी होते.

हत्येच्या रात्री आरोपी वडील रंगलाल सिंघल आणि मुलगा गौरव यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी गौरवने रागाच्या भरात वडिलांच्या कानशिलात लगावली. यावेळी मुलाला त्याने वडिलांसोबत जे कृत्य केले, त्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नव्हता उलट त्याने केलेले कृत्य योग्यच होते, असेच त्याला वाटत होते, असेही आरोपी रंगलालने पोलिसांना सांगितले.

पोलिस चौकशीत आरोपी रंगलालने पुढे सांगितले की, मुलाची उधळपट्टीची जीवनशैली आणि त्याचे तो ऐकत नसल्यामुळे तो खूप नाखूष होता. त्याशिवाय पत्नी नेहमी काहीही झाले तरी मुलालाच पाठीशी घालायची; ज्यामुळे तो आणखीनच निराश होत होता. मुलाच्या अशा वागण्यामुळे त्याचा स्वाभिमान दिवसेंदिवस वारंवार दुखावला जात होता. अशात गौरवने
लग्न करून एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नये, अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे लग्नाआधीच त्याने मुलाची हत्या केल्याचे कबूल केले.

आरोपीकडे अटकेच्या वेळी ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १५ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली; जी त्याने हत्येनंतर घरातून पळवून नेली होती, अशीही माहिती पोलिसांनी दिली.