Delhi Metro Viral Photo : सध्या सोशल मीडियावर रील बनविण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळते. त्यात मेट्रोच्या आत आणि मेट्रो स्थानकावर व्हिडीओ बनविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लोक कधी विचित्र, भन्नाट गोष्टींवर मेट्रो स्थानकावर रील बनविताना दिसत आहेत. या रील्स बनविणाऱ्यांमुळे अनेकदा इतर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. मेट्रो स्थानकामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकही त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात. त्यात आता मेट्रो स्थानकावरील एक फोटो व्हायरल होत आहे; ज्यामध्ये मेट्रो प्रशासनाने दिल्ली मेट्रोमध्ये रील्स बनविणाऱ्यांसाठी खास मेसेज लिहिला आहे. त्यात त्यांनी नेमके काय लिहिलेय ते जाणून घेऊ.

दिल्ली मेट्रो स्थानकावर दिसतील अशा आशयाचे मजकूर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा थेट मेट्रोच्या आत लोकांना रील बनविताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अशा लोकांसाठी दिल्ली मेट्रोने एक बोर्ड लावून, त्यांना मेसेज दिला आहे. ‘मेट्रोमध्ये प्रवास करताना अनावश्यक / अनधिकृतपणे बनवू नका रील, जबाबदार प्रवाशाप्रमाणे प्रवास करा आणि करा चांगल फिल’, असं या बोर्डावर लिहिल्याचं दिसतं. दिल्ली मेट्रो या मेसेजद्वारे लोकांना जागरूक करीत आहे आणि त्यांना मेट्रोमध्ये रील बनविण्यापासून रोखत आहे. हा बोर्ड एका मेट्रो स्थानकावर लावण्यात आला असून, त्याचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, हा बोर्ड दिल्लीतील नेमक्या कोणत्या स्थानकाचा आहे आणि फोटो कधी काढला गेला याची माहिती उपलब्ध नाही.

रविवारी नाश्त्यात रोजच्या इडलीऐवजी बनवा नाचणीची इडली; पटकन नोट करा सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल फोटो येथे पहा

हा फोटो एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) @ShoneeKapoor नावाच्या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. फोटो शेअर करताना अकाउंट युजरने कॅप्शनमध्ये लिहिलेय की, जर दिल्ली मेट्रोने त्या रील निर्मात्यांवर दंड ठोठावला, तर या पैशाने दिल्ली मेट्रो सर्वांत श्रीमंत संस्था बनू शकते. अशा प्रकारे लोक या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत.