Delhi Metro Viral Video: मेट्रोच्या स्थानकावर घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरते आहे. गर्दीत उभ्या असलेल्या एका तरुणीला अचानक एका अनोळखी व्यक्तीने हात लावल्याचा व्हिडीओ पाहून नेटिझन्स संतापले आहेत. पण, खरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे त्या क्षणी मुलीच्या सोबत असलेल्या तरुणाने जे केलं, ते पाहून प्रेक्षकही दंग झाले. काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये नक्की काय घडलं? कोणाला बसले लाथा-बुक्के? आणि त्यानंतर स्थानकावर कशी पसरली शांतता? हा सगळा प्रकार जाणून घेतल्याशिवाय तुम्ही स्क्रीनवरून नजर हटवू शकणार नाही…

दिल्ली मेट्रोमध्ये वाद, भांडणं आणि चकमकींची प्रकरणं वारंवार समोर येतात. सोशल मीडियावर अशाच एका नव्या व्हिडीओने सध्या खळबळ उडवली आहे. या व्हिडीओत मेट्रोच्या स्थानकावर उभ्या असलेल्या एका तरुणीला अचानक एका अनोळखी व्यक्तीने हात लावल्याचे दिसते. त्यानंतर जे घडलं, ते पाहून लोक थक्क झाले.

ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली, याची पुष्टी व्हिडीओमधून होत नाही. मात्र, व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की हा प्रकार दिल्ली मेट्रोमध्येच घडला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @delhi.connection या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिपर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून अनेकांनी लाइक आणि कमेंट्स केले आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. “दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा एकदा भांडण.”

क्षणात पेटला राग

व्हिडीओमध्ये दिसतं की एक मुलगी स्थानकावर उभी असताना एका व्यक्तीशी काही बोलत असते. इतक्यात ती व्यक्ती अचानक तिच्यावर हात उगारते. हे पाहताच तिच्यासोबत असलेल्या मुलाचा राग अनावर होतो. क्षणाचाही विलंब न करता तो मुलगा त्या व्यक्तीवर लाथा-बुक्क्यांची सरबत्ती करतो. मार खात ती व्यक्ती मागे सरकत कोपऱ्यात उभी राहते. त्याच्या डोळ्यावर मार बसल्याने तो दुखापत झालेल्या डोळ्याला हात लावताना दिसतो.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहून अनेक नेटिझन्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “योग्य उपचार केला आहे.” दुसऱ्याने लिहिलं, “दिल्लीतील लोकसंख्येचा दुष्परिणाम आहे हे.” आणखी एकाने कमेंट केली, “काही बेजबाबदार लोकांमुळे दिल्ली मेट्रोची बदनामी होत आहे.” बहुतांश लोकांचा सूर एकच, “महिलांवर हात उगारण्याचा अधिकार कोणालाच नाही.”

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/p/DNIHUuUyHLw/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=55322245-f0cb-4239-8a5e-42c66ac967c0

सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून लोक त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. नेमकी घटना कुठे घडली हे अजून स्पष्ट झालेलं नसून, या घटनेने पुन्हा एकदा मेट्रोतील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

डिस्क्लेमर: ही माहिती सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. यातील कोणत्याही दाव्याची आम्ही खात्री देत नाही.