उबेर टॅक्सी चालकाने एका तरुणीला चक्क टॅक्सीतून बाहेर फेकून देण्याची धमकी देण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. प्रिता बॅनर्जी ही उबेरच्या टॅक्सीने प्रवास करत असताना तिचा एसीवरून टॅक्सी चालकाशी वाद झाला. त्यानंतर टॅक्सी चालकाने तिला गाडीतून बाहेर फेकण्याची धमकी दिली. दिल्लीमध्ये हा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार तिने ट्विट करून उबेर कंपनीला लक्षात आणून दिला. टॅक्सी चालक कनुवार याला गाडीतील एसीचे तापमान वाढवण्यास सांगितले पण त्यांनी ही माझी गाडी असून एसीचे तापमान किती ठेवायचे हे मी ठरवणार असे सांगत तिच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिला ही धमकी दिली असल्याचा आरोप या महिलेने ट्विट करत केला आहे.
हुज्जत घातल्याप्रकरणी या चालकाने तिच्यावर बेशिस्तपणाचा ठपका देखील ठेवला. तिने केलेल्या ट्विटमुळे उबेर इंडिया लगेच तिच्या मदतीला धावून आली. उबेर कंपनीच्या नियमाप्रमाणे कंपनीने या टॅक्सी चालकाची अधिक माहिती, टॅक्सीचा नंबर आणि प्रवासाचा मार्ग या संदर्भातली विस्तृत माहिती मागितली. तसेच सुरक्षित प्रवासासाठी या अॅपमधल्या हेल्प ऑप्शनवर क्लिक करुन मदत मिळवण्याची सूचनाही तिला केली. भांडण झाल्यानंतर या टॅक्सी चालकाने आपल्या सगळ्या ऑर्डर रद्द केल्या. त्यामुळे आपल्याला आणखी भिती वाटते असे लागोपाठ ट्विट प्रिता करत होती. तसेच या टॅक्सी चालकाने रागत आपल्या गाडीचा स्पीड वाढवला त्यामुळे आपला अपघात होणार होता असेही ट्विट या मुलीने केले.
.@Uber_India Your driver Kunwar driving Maruti Swift Dzire DL1Z7123 just threatened to throw me out of the car (1/3)
— Preetha (@preetha___) September 8, 2016
.@Uber_India Your driver Kunwar driving Maruti Swift Dzire DL1Z7123 just threatened to throw me out of the car (1/3)
— Preetha (@preetha___) September 8, 2016
That is unacceptable! Please share details via https://t.co/N1swcrgDIv and DM your email ID, we'll be in touch.
— Uber India (@Uber_India) September 8, 2016
the link you send is really slow. My phone data isn't sufficient to open it. Can I send the details here please?
— Preetha (@preetha___) September 8, 2016
Sure! If in an emergency, please use the Help option on you app and click on the SOS button, our team will reach out ASAP.
— Uber India (@Uber_India) September 8, 2016
.@Uber_India The driver tried to take advantage of the fact that even if I get off because he's insulting me, the fare will be charged.
— Preetha (@preetha___) September 8, 2016
.@Uber_India thanks. Also, I'm Uber pooling and he cancelled all other pool alerts coming to his phone, making it more unsafe!
— Preetha (@preetha___) September 8, 2016