Desi Jugaad : अनेक लोक डोकं वापरून अनोखे जुगाड शोधत असतात. कधी जुन्या वस्तूंपासून, तर कधी तुटलेल्या किंवा मोडलेल्या वस्तूंपासून नवीन वस्तू बनवून एकापेक्षा एक भारी जुगाड काही लोक शोधत असतात. सोशल मीडियावर असे अनेक थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एस्केलेटर दाबताच टॉयलेटमध्ये पाणी फ्लश होताना दिसत आहे. हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल.

भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. जीवन सोपे आणि सुसह्य करण्यासाठी अनेकदा लोकं नवनवीन जुगाड शोधून काढतात. आता टॉयलेटमध्ये फ्लश करण्यासाठी एका तरुणाने चक्क दुचाकीचा हँडल टॉयलेटमध्ये बसवला आहे.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एस्केलेटरचा स्पीड वाढवताच टॉयलेटमध्ये पाणी फ्लश होताना दिसत आहे. तुम्ही आतापर्यंत अशी सर्जनशीलता यापूर्वी कधीही पाहिली नसेल.

हेही वाचा : वयाचं बंधन कशाला? फक्त नाद पाहिजे; उतारवयात खेळताहेत लाठी-काठी; गणेशोत्सवासाठी आजोबांचा उत्साह पाहून नेटकरी म्हणाले ….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

techniiverse या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “जुगाड असावा तर असा”, तर एका युजरने मजेशीरपणे विचारले, “या हॅन्डलला असलेल्या ब्रेकचं काय काम आहे?” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही डिझाइन खूप सोयीस्कर बनवली आहे, मला हा ट्रिक आवडली.”