scorecardresearch

Premium

Video: ऑफिसमध्ये बसल्या- बसल्या बनवला पिझ्झा, कर्मचाऱ्याचा भन्नाट जुगाड पाहून युजर्स म्हणाले, “या नादात…”

Desi Jugaad Video: सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पिझ्झाप्रेमींना नक्कीच आवडेल, यामध्ये एक कर्मचारी ऑफिसच्या डेस्कवर बसून आरामात पिझ्झा बनवताना दिसत आहे.

pizza making desi jugaad viral video
ऑफिसमध्ये बसल्या- बसल्या बनवला पिझ्झा, कर्मचाऱ्याचा भन्नाट जुगाड (photo – @pareekhjain twitter)

Pizza Making Jugaad Viral Video : ऑफिसमध्ये बसल्या- बसल्या अनेकदा पिझ्झाा खाण्याची खूप इच्छा होते, पण काहीवेळा ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. पण विचार करा, तुम्हाला पिझ्झा खाण्याची इच्छा झाली आणि बसल्या-बसल्या तुमच्या हातात पिझ्झा आला तर? तुम्हाला हे कदाचित अशक्य वाटेल, पण एक कर्मचाऱ्याने हे शक्य करुन दाखवलं आहे. या कर्मचाऱ्याने चक्क ऑफिस डेबललाच पिझ्झा ओव्हन बनवत त्यात गरमा-गरम टेस्टी पिझ्झा बनवला आहे. कर्मचाऱ्याने पिझ्झा बनवण्यासाठी केलेला देसी जुगाड व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऑफिसमध्ये अनेक जण ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करतात. पण ही ऑर्डर येईपर्यंत खूप वेळा जातो आणि पिझ्झा थंड होतो. थंड पिझ्झा अजिबात टेस्टी लागत नाही, त्यामुळे आपल्याला पिझ्झा खाण्याची पाहिजे तशी मज्जा घेता येत नाही. अशा परिस्थितीत एका कर्मचाऱ्याने चक्क ऑफिसच्या डेबलमध्येच पिझ्झा बनवण्यासाठी एक सोय केली आहे. ही पाहून तुम्हीही त्याचे कौतुक कराल.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कर्मचारी ऑफिसलच्या डेबलला ड्रिल मशीनने होल करतो. यानंतर पाण्याच्या स्टीलच्या बॉटलचा खालचा भाग कट करून वरचा भाग त्या होलमध्ये फिट करतो यानंतर डेबलच्या सर्वात खालल्या रॅकमध्ये ग्रेटर लावून कोळसा भरण्यासाठी एक सोय करतो. तर दुसऱ्या रॅकमध्ये पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवतो, त्यावर चीजचे बारीक तुकडे आणि इतर पदार्थ तो व्यवस्थित टाकून घेतो. यानंतर काहीवेळात त्याचा पिझ्झा चांगल्या प्रकारे बेक होऊन खाण्यासाठी तयार होतो. खरोखर, ही अनोखी पद्धत क्वचितच कोणी शोधून काढली असेल.

ट्विटरवर (@pareekhjain) नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की – जेव्हा इंजिनिअरला ऑफिसमध्ये पिझ्झा खाण्याची इच्छा होते. या व्हिडिओला आत्तापर्यंत १ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘बेरोजगार आहे असा वाटतोय.’ तर दुसर्‍या एका युजरने लिहिले की, पिझ्झाच्या नादात हा ऑफिस जाळेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-07-2023 at 16:39 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
गणेश उत्सव २०२३ ×