सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांनी केलेल्या भन्नाट जुगाडाचे फोटो, व्हिडीओ आपण पाहत असतो. शिवाय यातील काही जुगाड आपल्या देशातील असतात तर काही दुसऱ्या देशातील. सध्या पाकिस्तानातील एका व्यक्तीने केलेल्या अनोख्या जुगाडाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत, तर काहींना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे. या फोटोत नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.

एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने दावा केला आहे की, एका पाकिस्तानी व्यक्तीने कोंबडीला हिरवा रंग दिला आणि तिला पोपट म्हणून ऑनलाइन विकलं. मात्र, ही घटना खरोखर घडली आहे की अशीच अफवा पसरवली जात आहे, याबाबतची पुष्टी अद्याप झालेली नाही. पण इंस्टाग्राम वापरकर्त्याने केलेला दावा वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा- “बायकोच्या पायांची मालिश…” मुलगा करोडपती, आई करते दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी…; वृद्ध महिलेने सांगितली धक्कादायक कहाणी

कोंबडी पोपट म्हणून विकली –

व्हायरल फोटोत एक हिरव्या रंगाची कोंबडी दिसत आहे. जी पाकिस्तानातील एका व्यक्तीने पोपट म्हणून OLX वर विक्री करण्यासाठी ठेवला होता. त्याने या रंगवलेल्या कोंबडीची किमंत साडे सहा हजार रुपये इतकी सांगितली होती. शिवाय त्याने स्वस्त दरात, पोपट विकत असल्याचे OLX वर सांगितले होते. पण जेव्हा एका व्यक्तीने हा पोपट खरेदी केला तेव्हा त्याचाच पोपट झाला, कारण त्याला आपण विकत घेतलेला पोपट नसून रंग दिलेली कोंबडी असल्याचं समजलं. या घटनेची सध्या सोशल मीडियावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

हेही पाहा- Video: ‘तू ही यार मेरा’ दिल्ली मेट्रोत मुलाने मुलाला केले प्रपोज! गळाभेट घेत…

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका यूजरने लिहिले आहे, “खरेदी करायला गेलेला माणूस नशेत गेला होता?” तर दुसर्‍या एकाने लिहिले, “सकाळी जेव्हा त्याने आवाज केला असेल तेव्हा खरेदी करणाऱ्याला भिती वाटली असेल की, माझ्या पोपटाचे काय झाले?” शेख नावाच्या युजरने लिहिले की, जे काम जगात दुसरे कोणी करू शकत नाही ते फक्त पाकिस्तानी करू शकतात. वसीम नावाच्या युजरने लिहिले, लोकांना चुना लावण्यात पाकिस्तानी लोकांचा कोणी हात धरु शकत नाही. तर एका नेटकऱ्याने, “याला, धंदा म्हणतात पाकिस्तानात काहीही अशक्य नाही.” असं लिहिलं आहे.