Jugad viral video: उन्हाळ्यात अंगातून घामाच्या धारा वाहतात. अशावेळी वारंवार अंघोळ करावीशी, हातपाय, चेहरा धुवत राहावासा वाटतो.देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातीलही अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलच नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उन्हाचे चटके आणि उकाडा एवढा वाढला आहे, की पंखा लावूनही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशात अनेकजण दिवसभरात अनेकदा अंघोळ करून शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी एक अनोखा जुगाड सांगणार आहे. त्यांनी अवघ्या १० रुपयांत एसीसारख्या हवेसारखा कूलर बनवलाय. हा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

उकाड्यापासून सुटका करण्यासाठी एका व्यक्तीने सोशल मीडियावर अनोखा जुगाड व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा जुगाड जाणून तुम्हीही या व्यक्तीचं कौतुक कराल. ज्यामध्ये एका व्यक्तीने उन्हाळ्यात थंडावा मिळावा यासाठी एक अप्रतिम देसी जुगाड केल्याचं दिसून येतं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती पहिल्यांदा १० रुपयांचं मडकं फोडतो. त्यानंतर तो असे बरेच मडके घेतो आणि फोडताना दिसत आहे.हे फोडलेल्या मडक्यांचे तुकडे एका मोठ्या बॉक्समध्ये तो टाकतो. मग मध्यभागी एक चांगलं मडकं ठेवतो. त्यामध्ये पाईपने पाणी सोडतो. पूर्ण तळ पाण्याने भरतो. त्यानंतर बॉक्सला समोरुन कूलरसारखी जाळी लावतो आणि आतमध्ये फॅन टाकतो. यानंतर कूलर ऑन करते, आता पुढे काय होते ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. या व्यक्तीनेही अवघ्या १० रुपयांमध्ये हा देसी जुगाड केल्याचा दावा केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुणेकरांचा नाद लय बेकार! नियम तोडणाऱ्या पोलिसांना शिकवला धडा; पाहा कशी घडवली अद्दल

अशी पद्धत तुम्ही याआधी कधीही पाहिली किंवा ऐकली नसेल. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर jasvir_engineer_offical नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, हे टॅलेंड भारताबाहेर जाऊ देऊ नका, अशी कमेंट केली आहे. इतरही अनेकांनी या जुगाडचं कौतुक केलं आहे.