Viral Video: कुत्रा आणि मांजर हे अनेकांचे आवडते प्राणी आहेत. या पाळीव प्राण्यांना अनेकदा घरातील इतर सदस्यांप्रमाणेच किंबहुना त्याहून अधिक चांगली वागणूक दिली जाते. या दोन्ही लाडक्या प्राण्यांचे त्यांच्या घरातील अनेक मजेशीर व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल.

प्राणीदेखील माणसांप्रमाणेच हुशार असतात. त्यांना त्यांचे आवडते पदार्थ, आवडते छंद हे सर्व काही ठाऊक असतं. या व्हायरल व्हिडीओमध्येही असंच काहीतरी होत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओतील कुत्र्याला त्याची मालकीण दुरूनच एक पदार्थ दाखवते. ते पाहून कुत्रा असं काही करतो; ज्यामुळे त्याची मालकीणही मोठमोठ्याने हसते.

हा व्हिडीओ x (पूर्वीचे ट्विटर)वरील ?o̴g̴ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा दुरून पळत येत असताना त्याची मालकीण त्याला चिकनचा एक तुकडा दाखवते. चिकन खायला मिळणार या आनंदानं कुत्रा पळत येताना मधेच पुढचे दोन पाय वर करून जबरदस्त डान्स करतो. कुत्र्याचा तो डान्स पाहून मालकीणही मोठमोठ्याने हसते. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं कॅप्शनमध्ये “ट्रीट पाहून कुत्रा आनंदानं डान्स करतो…” असं लिहिलं आहे.

हेही वाचा: माणुसकीला काळिमा! पोलिस अधिकाऱ्याकडून बैलाला अमानुष मारहाण; VIDEO पाहून युजर्सनी व्यक्त केला तीव्र संताप
पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, त्यावर युजर्सही अनेक गमतीशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “हा किती गोड आहे. त्याला खाऊ मिळायलाच हवा”, तर आणखी एकानं लिहिलंय, “चिकन पाहून तो जॉली मूडमध्ये गेला.”, या व्हिडीओला आतापर्यंत जवळपासा ४.६ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, दीड लाखाहून अधिक जणांनी त्याला लाइक केले आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील एका कुत्र्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यामध्ये तो चक्क पावसात भिजण्याचा आनंद लुटत असल्याचे दिसत होते. तो व्हिडीओही खूप चर्चेत होता.