आधीच्या काळात प्रत्येकजण शक्तीमानला (shaktimaan) ओळखत होता. कारण ही मालिकाचं त्यावेळी एवढी गाजली होती. या मालिकेतील शक्तीमान हे पात्र मुकेश खन्ना यांनी साकारले होते. आजही शक्तीमानला खूप फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळेच शक्तीमानच्या गाण असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video)होत आहेत. आता असाच एक ‘देसी शक्तीमान’चा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कुर्ता पायजमा घातलेला दिसत आहे. तो शक्तीमानच्या गाण्यावर नाचताना दिसतो. अर्थात हे गाणं पार्श्वभूमीवर लावलं आहे. त्या व्यक्तीने तपकिरी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. यासोबतच डोक्यावर स्कार्फ बांधला आहे. ही व्यक्ती हातगाडी आणि बकरीजवळ रस्त्यावर नाचताना दिसत आहे.

(हे ही वाचा: मुलाने आणली इंजिनिअर सून, सासूने सांगितलं जेवण बनवायला आणि मग…; बघा हा मजेशीर Viral Video)

(हे ही वाचा: रेल्वे रुळावर अचानक आला हत्ती आणि…; बघा Viral Video)

शक्तीमान शोबद्दल बोलायचे झाले तर हा ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय शो होता. हा शो पहिल्यांदा डीडी नॅशनल वाहिनीवर १९९७ मध्ये प्रसारित झाला होता. त्यानंतर हा सुपरहिरोवर आधारित शो टीव्हीवर चांगलाच हिट झाला होता. या शोच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, शक्तीमानचा ड्रेसही बाजारात उपलब्ध होता. हा कार्यक्रम २००५ पर्यंत टीव्हीवर प्रसारित झाला होता. शक्तीमानमध्ये मुकेश खन्ना व्यतिरिक्त वैष्णवी महंती, किटू गिडवानी, सुरेंद्र पाल, ललित पारिमू आणि टॉम अल्टर यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

(हे ही वाचा: Video Viral:…आणि काही सेकंदात सापाने केली उंदराची शिकार)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

mirza_mee_hus नावाच्या इंस्टाग्राम हँडलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्यक्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स व्हिडीओला लाइक करत आहेत. या व्हिडीओला २६ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.