तुमच्या लहानपणी तुम्ही ‘जॉनी-जॉनी येस पापा’ ही कविता ऐकली असेल. आता तर तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या तोंडूनही दिवसातून कितीवेळा तरी ही कविता ऐकत असाल. आज बऱ्याच वर्षानंतरही ही कविता तेवढीच लोकप्रिय आहे. सध्या याच जॉनी जॉनी कवितेचं एक वेगळं व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. जे फारच मजेदार आहे. या कवितेचे देसी व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक काका शास्त्रीय संगीताच्या सुरात ही कविता गाताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की अशी शैली तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.

शास्त्रीय शैलीत गायले “जॉनी जॉनी येस पापा”

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक काका त्यांच्या मित्रांच्या ग्रुपसोबत ‘जॉनी-जॉनी येस पापा’ ही कविता गात असल्याचे दिसत आहे. काका शास्त्रीय शैलीत ही कविता गाताना दिसतात. ग्रुपमध्ये उपस्थित असलेले इतर लोकही त्याला साथ देत आहेत. एक व्यक्ती हार्मोनियम वाजवत असताना दुसरी व्यक्ती तबला वाजवताना दिसत आहे. दुसरीकडे काकांच्या मागे बसलेले लोक त्यांच्या आवाजात सहभागी होत आहेत. संपूर्ण कविता शास्त्रीय संगीताच्या शैलीत गायली आहे. हे गाणं ऐकून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.

(हे ही वाचा: स्टाफ क्वार्टरमध्ये पोहोचले बिबट्याचे संपूर्ण कुटुंब अन् जे घडलं…; पाहा व्हायरल व्हिडीओ)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांनी व्हिडिओवर कमेंट करून गायकाचे केले कौतुक

व्हायरल झालेला हा व्हिडीओ बघून सगळेच लोक अवाक् झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @HasnaZaruriHai नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लिहेपर्यंत सुमारे ७ लाख लोकांनी तो पाहिला आहे आणि ९ हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी ही कविता गाणाऱ्या गायकाचे कौतुक केले. एका वापरकर्त्याने म्हटले, “भारतीय शास्त्रीय संगीत अप्रतिम आहे, त्याने इंग्रजी कवितेत खूप जीव ओतला आहे.” दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, “तुम्हाला सलाम. या इंग्रजी कवितेला जीवदान देणारी भारतीय शास्त्रीय संगीताची शालीनता पहा.” लोक गायकाचं भरभरून कौतुक करत आहेत.

येथे पाहा व्हिडिओ