कधी-कधी टीव्ही सीरियल्समध्ये असे सीन्स बघायला मिळतात, जे पाहून आपल्याला हसू येते. भारतीय मालिकांमधील विचित्र दृश्यांनी यापूर्वीही लोकांना आश्चर्यचकित केले आहे. तुम्हाला हे आठवत असेल की ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत गोपी बहूने लॅपटॉप साबणाने धुतला होता. इतकंच नाही तर ‘ससुराल सिमर का’चा एक सीन चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सासूने आपल्या सुनेला एवढ्या जोरात कानाखाली मारली की ती गोल गोल फिरत पडद्याजवळ गेली आणि नंतर तिच्या गळ्यात पडदा अडकून तिची मान दबली गेली. असाच आणखी एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘ऐ तोबे सोहोचोरी’ या बंगाली मालिकेतील एक विचित्र दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘हाऊ टू मॅरी युअर क्रश’ या कॅप्शनसह शोमधील एक क्लिप नुकतीच सोशल मीडियावर आली आहे.

शिक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनवणी करणाऱ्या बिहारच्या सोनूसाठी धावून आला बॉलिवूडचा सोनू; केली ‘ही’ मदत

बंगाली लग्नाच्या या क्लिपमध्ये दाखवण्यात आलंय की वधू वराच्या गळ्यात वरमाला घालणार तितक्यात एक माणूस वराला धक्का देतो आणि स्वतः वधूच्या समोर येऊन उभा राहतो. या प्रकारामुळे वधू चुकून लाल कुर्त्यातील पुरुषाच्या गळ्यात जयमाला घालते. असे झाल्यावर वधूला आणि कुटुंबीयांनाही धक्का बसतो. यानंतर हा माणूस वराच्या हातातून वरमाला हिसकावून घेतो आणि वधूच्या गळ्यात घालतो. मग तो नाटकीय पद्धतीत चिमूटभर नाही, तर मूठभर कुंकू घेऊन वधूच्या संमतीशिवाय तिच्या भांगेत भरतो.

या टीव्ही सीरियलमध्ये ती व्यक्ती दुसरी कोणी नसून वराचा भाऊ असतो, जो वराला वधूसोबत लग्नाच्या बंधनात अडकण्यापासून वाचवत असतो. या मालिकेच्या कथेनुसार, हा वर आधीच विवाहित आहे, जो एक प्राध्यापक आहे आणि वधू त्याची विद्यार्थिनी आहे, जी गर्भवती आहे. या वधूने संपूर्ण कुटुंबालाच त्रास दिला नाही तर प्राध्यापकाने तिच्याशी लग्न करावे म्हणून सर्वांचा छळही केला. प्राध्यापकाचा मुलगा या वधूच्या वयाचा आहे.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रोफेसरच्या बायकोचा हेवा वाटल्याने वधूने असे केले. प्रोफेसरची बायको अतिशय परफेक्ट आणि सुसंस्कृत, पण पती आणि सासरच्या लोकांकडून दुर्लक्षित अशी असते. आता या दुसऱ्या लग्नातून प्राध्यापकाला वाचवण्यासाठी त्याच्या भावाने शेवटच्या क्षणी जबरदस्तीने हे लग्न केले, असे या मालिकेत दाखवण्यात आले आहे.