Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक लोकं आश्चर्यचकीत करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.एका तरुणाने सर्वात लहान आकाराचा आलू पराठा बनवला आहे. गॅसवर नाही किंवा तव्यावर नाही तर चक्क सीपीयू वर आलू पराठा बनवला आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे पण हे खरंय. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
सोशल मीडियावर दररोज नवनवीन टॅलेंट पाहायला मिळते. काही गोष्टी इतक्या हटके असतात की ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सीपीयूवर बनवला आलू पराठा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण आलू पराठा बनवताना दिसेल. तो त्यासाठी अगदी कमी आकाराची गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी लाटतो आणि त्या पोळीवर बटाट्याची भाजी टाकतो. त्यानंतर आलू पराठा बनवतो. हा आलू पराठा तो गरम तव्यावर नाही तर सीपीयूवर बनवतो. सीपीयूच्या मदरबोर्डवर तो तेल लावतो आणि त्यावर हा आलू पराठा दोन्ही बाजूने नीट भाजतो. या व्हिडीओत या तरुणाने याबाबत सविस्तर सांगितली आहे. व्हिडीओत तो सांगतो, ” मी आलू पराठा बनवण्यासाठी जुन्या सीपीयूचा वापर करत आहोत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आय सेव्हन, आय नाइन सारख्या सीपीयूचा वापर करू शकता. यामुळे तुमचा पराठा लवकर भाजणार. पण या रेसिपीला लॅपटॉपच्या सीपीयूमध्ये करू नका.” तो सांगतो की त्याने यापूर्वी ऑमलेट सुद्धा सीपीयूवर बनवले आहे. सीपीयूवरील पराठा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : तरुणाने लग्नासाठी हटक्या अंदाजात केले प्रपोज, गर्लफ्रेंडही नकार देऊ शकली नाही; व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

lets_tech_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सीपीयूवर आलू पराठा बनवला आहे” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स थक्क झाले. अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गॅस वाचवा आणि सीपीयूवर जेवण बनवा. तर एका युजरने लिहिलेय, “टेक्निकल शेफ” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा बिर्याणी बनवा”