दिवाळीत फटाक्यांच्या धूमधडाक्यामुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण पूर्णपणे थांबवणे शक्य नसल्याने आता ते कमी करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पर्यावरण प्रयोगशाळेने कमी प्रदूषण करणारे ‘ग्रीन’ फटाके बाजारात आणले असून त्यांना ग्राहकांकडूनही मागणी होत आहे. या फटाक्यांमध्ये गंधकाचा वापर टाळण्यात आला असल्याचे प्रयोगशाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून दिवाळीच्या खरेदीसाठी बाजार सजले आहेत. दिवाळी सणात मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. मात्र, या आतषबाजीमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. दिवाळीच्या काळात देशातील अनेक शहरांमध्ये प्रदूषणात वाढ झाल्याच्या नोंदीही उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवाळीच्या काळात फटाक्यांवर आळा घालण्यासाठी विविध प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येत आहेत. दिवाळीच्या सणात वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात कोळसा, सल्फर आणि पोटॅशियम नायट्रेट या रसायनांच्या मिश्रणाचा वापर करण्यात येतो. या फटाक्यांमुळे मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण होऊन हवा प्रदूषित होते. हे प्रदूषण टाळण्यासाठी यंदा राष्ट्रीय पर्यावरण प्रयोगशाळेने फटाक्यांमध्ये ही रसायने वापरणे बंद केले असून त्याऐवजी नायट्रोजनआधारित इंधन वापरून ‘ग्रीन फटाके’ तयार केले आहेत. हे फटाक्यांमुळे पारंपरिक फटाक्यांपेक्षा ३० टक्के प्रदूषण कमी होत असल्याचेही प्रयोगशाळेकडून सांगण्यात आले आहे. या फटाक्यांची किंमतही कमी आहे.

ग्रीन फटाक्यांचे विविध प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेल्या सुपर हिरो आणि कार्टून पात्रांच्या नावावर या फटाक्यांची नावे देण्यात आली आहेत. चॉकलेट बॉम्ब, स्पायडरमॅन फटाके, गूगल पाऊस अशी नावे फटाक्यांना देण्यात आली आहेत. फटाक्यांमध्ये चक्र, पाऊस, फुलबाज्या आणि लवंगी फटाक्यांच्या माळी या प्रकारात हे फटाके उपलब्ध आहेत.