Independence Day 2024 Quiz: अगदी शाळेत असल्यापासून आपण प्रत्येकवर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनासंदर्भातील अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला खरंच स्वातंत्र्यदिनासंदर्भात आणि तिरंग्याबद्दल किती गोष्टी ठाऊक आहेत? हे जाणून घेण्यासाठी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकसत्ता ऑनलाईनने खास तिरंगा क्विझ आणलं आहे. पटकन हे क्विझ सोडवा आणि स्वातंत्र्य दिन आणि भारताच्या तिरंग्यासंदर्भात तुम्हाला किती माहिती आहे हे जाणून घ्या. आपल्या देशाचा इतिहास बहुतांश नागरिकांना माहिती असतो, मग लोकसत्ता ऑनलाईनने आणलेलं तिरंगा क्विझ नक्की सोडवा. स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा क्विझ तुमच्यापैकी १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा आपला देश ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या दिवशी देशात विविध ठिकाणी तिरंगा फडकावला जाईल असं होईल. घरोघरी तिरंगाही फडकावण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच यादिवशी देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात. टेलिव्हिजनवरही देशभक्तीवर आधारित गाणी, चित्रपटही आपण पाहतो. भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. अगदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सरोजिनी नायडू यांच्यापर्यंत अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले. दुःखाच्या अनेक झळा सोसल्यानंतर अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.