महिंद्रा उद्योगसमूहाचे संचालक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. त्यांचे अनेक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायलं मिळतं. आनंद महिंद्रा युजर्सनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची बऱ्याचदा उत्तर देत असतात. काही दिवसांपूर्वी तुम्ही पंजाबी आहात का सर? असा प्रश्न एकाने महिंद्रांना विचारला होता. या ट्वीटला महिंद्रांनी दिलेलं उत्तर चांगलंच व्हायरल झालं होतं, तर प्रश्न विचारणाऱ्याने त्याचं ट्वीटच डिलीट केलं होतं. दरम्यान, आता देखील एका युजरने आनंद महिंद्रांना असाच एक प्रश्न विचारलाय. या प्रश्नाला महिंद्रांनी दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे.  

भारतातील एका मोठ्या वाहन उत्पादक कंपनीचे आनंद महिंद्रा स्वतःच्या कंपनीने बनवलेल्या गाड्यांशिवाय इतर कंपनीच्या गाड्या चालवतात का? असा प्रश्न नुकताच एका ट्विटर युजरने विचारला होता. त्याच्या या प्रश्नाचा महिंद्रांनी भन्नाट उत्तर दिलंय. महिंद्रा म्हणाले, “म्हणजे महिंद्रा व्यतिरिक्त इतर गाड्या आहेत, असं तुला म्हणायचंय का? मला कल्पना नव्हती. (चेष्टा करतोय)”. त्यांच्या या उत्तराला ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलंय.

दरम्यान, शुक्रवारी आनंद महिंद्रांनी करोनाबाबतचं एक ट्वीट रीट्वीट केलं होतं. “प्रत्येक देशाने आपआपला एक एक व्हेरिएंट काढावा. वर्षाच्या शेवटी आपण करोनाव्हायरल विश्वचषक स्पर्धा भरवूयात,” अशी उपहासात्मक प्रतिक्रिया देणारं एक ट्वीट रीट्वीट करताना आनंद महिंद्रांनी “मझा या विचाराला पाठिंबा आहे,” असं ट्वीट केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही पंजाबी आहात का?” विचारणाऱ्याला आनंद महिंद्रांनी असं काही उत्तर दिलं, की त्यानं ट्वीटच डिलीट केलं; वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल!