Dog Dance Viral Video : सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांची एक वेगळी; क्रेझ पाहायला मिळते. सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. नेटकऱ्यांना देखील पाळीव प्राण्यांचे मनोरंजन करणारे व्हिडीओ पाहायला आवडतात. lत्यात आता एका पाळीव कुत्र्याचा मजेदार व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओनं आमचं मनं जिंकून घेतलं असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

व्हिडीओमध्ये एक गोंडस पाळीव कुत्रा भन्नाट डान्स करताना दिसतो आहे. कारमधून जात असताना आवडतं गाणं वाजताच तो जबरदस्त गाण्याच्या ठेक्यानुसार तो लयबद्ध पद्धतीने मान डोलवू लागतो. यावेळी गाण्याचा एकही ठोका तो चुकवत नाही. विशेष म्हणजे त्याचे केसही इतके सुंदर आहेत की, ते हलताना आणखीच भारी दिसतायत. त्यात कुत्र्याचा मालकही त्याच्याबरोबर डोलतोय. कार रस्त्याच्या बाजूला उभी करून दोघेही नाचण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतात.

सोशल मीडियावर समोर आलेला हा व्हिडीओ @chuckles__wonders नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. नेटकरी या व्हिडीओवर छान छान प्रतिक्रिया देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Dog cute Viral Video
कुत्र्याचा नाचतानाचा व्हायरल व्हिडीओ

आतापर्यंत तो व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अधिक मजेशीर कमेंट्स देत आहेत. एका युजरने कुत्र्याचे अतिशय मजेदार वर्णन केले आहे; तर काही युजर्सचे म्हणणे आहे की, हा कुत्रा एखाद्या रॉक स्टारपेक्षा कमी नाही.