सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. सरकारी हॉस्पिटल किंवा इमारतींमध्ये कुत्रे फिरताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण यावेळी व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक शिक्षक वर्गात शिकवत असून एक कुत्रा त्याच्याजवळून जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ आयआयटी बॉम्बेचा असल्याचा दावा केला जात आहे.

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आयआयटी बॉम्बेचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक प्राध्यापक वर्गात शिकवत असताना एक कुत्रा त्याच्यापर्यंत पोहोचतो. हे प्राध्यापक बोर्डवर काहीतरी लिहित असतात तेव्हा एक कुत्रा त्याच्या पाठीमागे डेस्कवर जातो. हे पाहून वर्गात बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. आयआयटी बॉम्बेच्या वर्गात कुत्रा अगदी आरामात फिरताना दिसतो. दरम्यान कुत्रा डेस्कवरून खाली उतरतो आणि त्याच बाजूला बसतो. यानंतर, जेव्हा प्राध्यापक मागे वळतात तेव्हा त्यांची नजर कुत्र्यावर पडते, आणि पाहून तेही हसायला लागतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: घरात अठरा विश्व दारिद्रय! ना अकॅडमी ना क्लास; तरीही लेकीची महाराष्ट्र पोलिसात निवड, आईला अश्रू अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओला आतापर्यंत ३.५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. या व्हिडिओवर एका यूजरने लिहिले की, ‘माझा कुत्रा JEE Advanced पास झाला आहे. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘या कुत्र्याने मागच्या वर्षीचे लेक्चर मिस केले’. सोशल मीडियावर असे व्हिडिओ क्वचितच पाहायला मिळतात.