सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक गोंडस व्हिडीओ शेअर केले जातात. प्राणीप्रेमी तर या व्हिडीओंमुळे दिवस आनंदात जात असल्याचे कमेंट्स करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा आणि त्याचा मालक चालताना दिसत आहेत. पण या मालकाच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला चालताना त्रास होत असल्याचे दिसत आहे. यावर कुत्र्याने केलेल्या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

उद्योगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आणि त्यांचा कुत्रा चालताना दिसत आहेत. या व्यक्तीच्या पायाला दुखापत झाल्याने ते लंगडत चालत असल्याचे दिसत आहेत. हे पाहून हा कुत्रा त्यांची नक्कल करत लंगडत चालू लागतो. ही गोंडस नक्कल या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ९४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडिओ.

Video: तुम्ही कधी हवेत तरंगणारे विमान पाहिलंय का? बुचकळ्यात टाकणारा हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून, त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या पाहा.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : रावणाच्या पुतळ्यातून अचानक येऊ लागले अग्निबाण; जीव वाचवण्यासाठी लोकांनी काय केले पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालकाची गोंडस नक्कल करणाऱ्या कुत्र्याचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.