देव तारी त्याला कोण मारी! ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली आहे. म्हणजे जर एखाद्याच्या नशीबात मृत्यू नसेल तर कितीही मोठा अपघात झाला तरी त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. अन् याच म्हणीची प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक कुत्रा मृत्यूला चकवा देत स्वत:चा जीव वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रेल्वे ट्रॅकवर एक कुत्रा उभा आहे, मागून ट्रेन येतेय याचा त्याला जराही अंदाज नव्हता. तेवढ्यात त्याला ट्रेन येत असल्याचं दिसलं मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो. हा व्हिडीओ @ilhanatalay_ या Instagram अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक कुत्रा ट्रेनखाली येतो, रुळावरून धावताना दिसत आहे. रुळांवरून चालताना तुम्ही अनेकदा प्राणी पाहिले असतील. कधी गाय तर कधी कुत्रा सहज ट्रॅकवर येतो. ट्रेनला धडकून त्याचा मृत्यू होतो. असंच काहीसं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे, जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

कुत्र्यानं मृत्यूला दिला चकवा

या व्हिडीओमध्ये ट्रेन रुळांवरून वेगाने जाताना दिसत आहे. त्याच्या समोर एक कुत्रा धावताना दिसतो. अचानक कुत्रा ट्रेनखाली येतो. हे दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडेल, पण घाबरू नका! कारण या कुत्र्यानं मृत्यूला चकवा दिलाय. ट्रेनखाली येऊनही कुत्रा दोन चाकांमधून कसा तरी बाहेर येतो. मग तो धावतच शेताकडे जातो. हे पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: भर रस्त्यात धावत्या रिक्षाचा टायर बदलला; धोकादायक स्टंटबाजी पाहून भडकले लोक अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओला १० लाख व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. नेटकरही व्हिडीओ पाहून अवाक् झाले आहेत.