सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. असे लोक केवळ त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यांना विनाकारण त्रास देतात. मात्र, कधीकधी अशा लोकांना परिणामांनाही सामोरे जावे लागते. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्येही कुत्र्याला त्रास देणं एका मुलीला चांगलंच महागात पडलंय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,  ज्यामध्ये एक मुलगी कुत्र्याचा जबरदस्ती छळ करताना दिसत आहे. जोपर्यंत मनुष्य त्यांना त्रास देत नाही तोपर्यंत प्राणी मानवाला हानी पोहोचवत नाहीत. पण जेव्हा त्यांना माणसांचा त्रास होतो तेव्हा ते त्यांना सोडतही नाहीत. नुकतंच एका कुत्र्यानेही असेच काही केले. या कुत्र्यानं वैतागून या मुलीच्या अंगावर पायाने वाळू उडवायला सुरुवात केली. कुत्र्यानं त्या मुलीला कोणतीही इजा केली नाही मात्र तिला चांगलीच अद्दल घडवली. उगाच पाळीव प्राण्यांना त्रास दिला तर ते ही आपल्याला त्रास देतात हेच या व्हिडीओमधून पाहायला मिळालं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: आधी पँटची झिप उघडली; मग असभ्य भाषेचा वापर, गुजरातमध्ये महिला प्रवाशाचा ऑटो चालकाकडून विनयभंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 हा व्हिडीओ कोणाचा आणि कुठला आहे या बाबत काहीच माहीती हाती आली नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक यूजर्स त्यावर कमेंट देखील करत आहेत. काही यूजर्सनी अशा विधींवर प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.