scorecardresearch

Video: भुकेलेल्या वाघाच्या पिल्लांना दूध पाजताना दिसली कुत्री; नेटकरी म्हणतात ”आई तर….”

हा भावूक आणि अतिशय गोंडस व्हिडिओ इंस्टाग्रामवर kc1606 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

Video: भुकेलेल्या वाघाच्या पिल्लांना दूध पाजताना दिसली कुत्री; नेटकरी म्हणतात ”आई तर….”
photo(social media)

देवाला सर्वांपर्यत पोहोचता आलं नाही म्हणून त्याने निर्मिती केली ती म्हणजे आईची. आई हा शब्द ममता पासून आला आहे. आई कुणाचीही असो प्रत्येक आईमध्ये ममता ही असतेच. एक आई दुसऱ्याच्या मुलाला भुकेने रडतानाही पाहू शकत नाही. ती लगेच त्याच्या जवळ जाते आणि त्याला मायेची ऊब देते. या सर्व केवळ सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत तर कालांतराने याची अनेक उदाहरणेही समोर आली आहेत. सध्या असाच एक आईच्या ममतेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक कुत्रीण चक्क वाघाच्या पिल्लाला दूध पाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कुत्री वाघाच्या मुलांना दूध पाजताना दिसत आहे. एक पांढऱ्या रंगाची कुत्री शांत बसली आहे आणि वाघाची तीन मुले तिचे दूध पीत आहेत. वाघाची पिल्लही आनंदाने दूध पिताना दिसत आहेत. खरं तर या दोन प्राण्यांच्या प्रजातींमध्ये बराच फरक असला तरी आईचे प्रेम आणि मुलांची भूक यामुळे या फरकाचे रूपांतर प्रेमात आणि मायेत झाले आहे.

( हे ही वाचा: Video: आधी महिलेला बाईकवर बसवलं, मग बाईक खांद्यावर उचलून गावकऱ्यांनी पार केली नदी; बघा पुरातील हे भयानक दृश्य)

वाघाच्या मुलांना दूध पाजणारी कुत्री

( हे ही वाचा: अंतराळात शारीरिक संबंध शक्य नाही! मग अंतराळवीर गर्भधारणा करु शकतात यावर चर्चा का?)

लोकांनी कुत्रीचे केले कौतुक

हा भावूक आणि अतिशय गोंडस व्हिडिओ इंस्टाग्रामवर kc1606 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना बाँडिंग खूप आवडल आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लाखो लोकांनी लाइकही केले. या व्हिडिओ अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक या माता कुत्र्याचे खूप कौतुक करत आहेत. या माता कुत्र्याने दाखवलेल्या ममतेने नेटकाऱ्यांचे मन जिंकले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या