Pune Shocking video: कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान पुण्यातून कुत्र्यांच्या हल्ल्याची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेत एका हिंस्र जातीच्या कुत्र्याने एका माणसावर हिंसक हल्ला केल्याचा व्हिडीओही सध्या व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुण्यातील एका पेट्रोल पंपावर एका व्यक्तीवर भटक्या कुत्र्यानं जीवघेणा हल्ला केला आहे. या कुत्र्यान अक्षरश: व्यक्तीचा हात फाडला आहे आणि तरीही तो हात सोडत नाहीये. या कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी आजूबाजूचे सगळे लोक पुढे आले आहेत मात्र हा कुत्रा इतका हिंस्र आहे की तो वारंवार या व्यक्तीवर हल्ला करत आपल्या जबड्यात त्याचा हात पकडून ठेवला आहे. यावेळी हा व्यक्ती जखमी झाल्याचं आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी मोठ मोठ्यानं ओरडताना दिसत आहे. त्या कुत्र्यांनी त्याला खाली पाडले आणि ओरबाडून काढले. इतकेच नाही, तर एका ठिकाणाहून दुसरीकडे त्याला फरपटत नेले. त्यांनी त्याचे डोके, हात, पाय असे मिळेल तिथे ते कुत्रे चावे घेत होते. एखाद्या खेळण्याप्रमाणे ते त्याला रस्त्यावर गरगर फिरवत राहिले.
पाहा व्हिडीओ
संपूर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत
बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.
या दुर्घटनेने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका अधोरेखित केला आहे. शासन व स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी पावले उचलणे गरजेचे आहे; जेणेकरून भविष्यात अशा संभाव्य दु:खद घटनांना आळा बसेल.