Puneri pati in Dombivali: पुणेरी पाट्या हा वर्षानुवर्षे चर्चेत राहिलेला विषय आहे. पुणेकरांच्या या पुणेरी पाट्या जितक्या वाचायला मजेशीर असतात तितक्याच त्या खोचकपणे चांगला संदेश देऊन जातात. पुणेकरांची शान असलेली ही पाटी अनेकदा लोकांचा अपमान करते; पण नियम म्हणजे नियम आणि याचे पालन केलेच पाहिजे, असा धडा शिकवून जाते.पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. मात्र ही पुणेरी पाटी आता डोंबिवलीत पाहायला मिळालीय.

खराब रस्त्यांच्या प्रश्नावर आजवर अनेकदा मोठमोठ्या चर्चा झाल्या आहेत. लोकांनी आंदोलनं केली आहेत. निवडणुकांमध्येही रस्त्यांचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला गेला आहे. तरीही राज्यभरातील रस्ते फारसे चांगले आहेत असं चित्र आजही दिसत नाही. तात्पुरते रस्ते बनवले जातात आणि पावसाची एक सर आली की संपूर्ण रस्ता वाहून जातो. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. अगदी मुंबई-पुणे ही आंतरराष्ट्रीय शहरं मानली जात असली तरी येथील रस्तेही खड्डेमयच आहेत. दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाला अद्दल घडवण्यासाठी डोंबिवलीकरांनी खास बॅनरबाजी केली आहे.

आता तुम्ही म्हणाल या पाटीवर लिहलंय तरी काय? तर या पाटीवर “खासदार, आमदार, स्थानिक नगरसेवक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तुम्ही आम्हाला एवढा उत्तम आणि दर्जेदार रस्ता दिला, त्याबद्दल तुमचे आभार.आणि असे लोकप्रतिनिधी निवडून दिल्याबद्दल सामान्य जनतेचेही आभार.” असा मजकूर लिहिला आहे. आणि हा बॅनर कोणी काढू नये म्हणून शेवटी, “नामर्दासारखे बॅनर काढू नका, रस्ता दुरूस्त करा.” असंही लिहलं आहे.

पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा फोटो सोशल मीडियावर things2doindombivli_ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अशा अनेक पुणेरी पाट्या रोज व्हायरल होत असतात. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एकानं म्हटलंय “पुणेकरांच्या स्टाईलने बरोबर अद्दल घडवली” तर दुसरा म्हणतो “हा नक्कीच डोंबिवलीत राहणारा पुणेकर असणार”