Viral video: घरातील जेष्ठ मंडळी सांगतात हॉटेलमध्ये जाऊन खाऊ नका.कारण हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या अन्न-पदार्थामधील स्वच्छतेबाबत काय संशय असतो. अनेक मोठमोठ्या हॉटेलच्या किचनमध्ये अक्षरश: उंदीर, पाली, झुरळं फिरत असतात. काही हॉटेल्समध्ये खाद्यतेल सुद्धा दुषित स्वरूपात वापरलं जातं.असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.म्हणूनच घरचं पौष्टिक खाण्याचा सल्ला दिला जातो. फळे खा पौष्टक असतात हेसुद्धा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. मात्र आता विचार करा की, फळांमध्येही विष आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं तर…कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही फळे भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात.
कोणत्याही मोसमात मिळणारं, स्वस्त आणि पौष्टिक फळ म्हणजे केळी. कोणत्याही शहरात जागोजारी केळ्यांची विक्री होत असते. आता श्रावण महिना सुरु झाल्यानं उपवासासाठीही केळ्यांची मोठी मागणी असते. त्याचवेळी केळी विक्रीचं एक धक्कादायक वास्तव डोंबिवलीमध्ये उघड झालं आहे
डोंबिवलीमध्ये हातगाड्यावरील केळी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात काढून पुन्हा हातगाडीवर ठेवल्याचा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एका हातगाडी चालक गाडीवर केळी घेऊन चालला आहे. त्याची काही केळी रस्त्यावर पडली. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या घाण पाणयात पडलेली केली त्याने पुन्हा गाडीवर ठेवली. त्यामुळे डोंबिवलीकरांनो तुम्ही केळी खात असाल तर ती स्वच्छ पाण्यात धूवून विकली जात आहे की नाही याची खात्री करावी
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून लोक व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “यांच्यावर लगेच कारवाई करा” तर आणखी एकानं “आता खायचं तरी काय, एकदाच घ्या लोकांचा जीव घ्या”” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
व्हिडओ पाहून सोशल मीडियावर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बाजारात विकल्या जाणाऱ्या भाज्यांच्या अस्वच्छतेबाबतही अनेकांनी संताप आणि चिंता व्यक्त केली आहे. आरोग्यदायी आहारात हिरव्या भाजा, फळे समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर अनेकदा देत असताना, मात्र आताा अशा प्रकारामुळे अनेकांना त्यांच्या अन्नाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.