Drunk Husband Assaults Wife Viral Video : नवरा-बायकोच्या नात्यात अनेकदा लहान मोठ्या गोष्टींवरून भांडणं होत असतात. पण, काहीवेळा या भांडणाचे रुपांतर इतक्या भीषण घटनेत होते की आपण विचारही करू शकत नाही. अशाचप्रकारे एका नवरा-बायकोच्या भांडणाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओत एका मद्यधूंद अवस्थेत असलेल्या नवऱ्याने त्याच्या बायकोला बेदम मारहाण केली. यानंतर छतावरून तिला उलटं लटकावलं अन् नंतर असं काही केलं की पाहून तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी बायकोने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक धावत आले, त्यांनी महिलेच्या पतीला छतावरून तिला खाली सोड अशी विनंती केली, यानंतर पतीने खाली सोडताच लोकांनी तिला पकडून खाली उतरवले. पतीच्या मारहाणीत पत्नी गंभीररित्या जखमी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पीडित महिलेच्या भावाने पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तिच्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना बरेलीमध्ये घडली आहे.

पीडित महिलेचे नाव डॉली असे आहे. तिच्या भावाने पोलिस ठाण्यामध्ये केलेल्या तक्रारीत म्हटले की, १२ वर्षांपूर्वी डॉलीचे (त्याच्या बहिणीचे) नितीन सिंग नावाच्या व्यक्तीशी लग्न झाले. नितीनला दारू पिण्याचे व्यसन होते. तो रोज दारू पिऊन घरी येत पत्नीला मारहाण करायचा. डॉलीच्या आई-वडिलांनीही त्याला अनेकदा समजावले, पण त्याचे दारूचे व्यसन काही सुटले नाही, तसेच डॉलीला मारहाण करणंही थांबलं नव्हतं.

अशाप्रकारे १३ मे २०२५ च्या रात्री तो दारू पिऊन आला आणि त्याने डॉलीला बेदम मारहाण केली. यानंतर तिला छतावरून खाली लटकवले आणि नंतर खाली सोडून दिले. अशाप्रकारे त्याचा डॉलीला जीवे ठार मारण्याचा प्लॅन होता, पण सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत तिचा जीव वाचवला, अशी माहिती डॉलीच्या भावाने पोलिसांना दिली.

या धक्कादायक प्रकरणी डॉलीचा पती नितीन सिंग, अमित कुमार आणि दोन महिलांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कण्यात आली आहे. पण, नितीन सिंग घटनेनंतर फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, घटनेवेळी डॉलीच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्डिंग केले, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नितीन डॉलीला छतावरून उलटं लटकवत खाली फेकण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. यावेळी डॉली जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने जोरजोरात ओरडत असल्याचेही दिसतेय.