Viral Video: गाडीचालकाने गाडी चालवताना कोणकोणते नियम पाळले पाहिजेत हे समजून घेणे आणि त्याचा अंमल करणे आवश्यक असते. गाडी चालवताना वेग मर्यादा, सिग्नल्स, लेन मार्किंग या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पण, अनेक जण गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे आदी गोष्टी करताना दिसतात. त्यामुळे वाहतूक पोलिस या वाहनचालकांचा परवाना निलंबित करतात किंवा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करतात. पण, अनेक वाहनचालक ही बाब लक्षात न ठेवता सर्रास मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालतात. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ दिल्लीचा आहे. दिल्लीतील एका ब्रिजवर दुचाकीचालक एक चारचाकी वाहनाचा पाठलाग करताना दिसत आहे. चारचाकी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर प्रकरण असं आहे की, चारचाकी चालक दिल्लीच्या रस्त्यावरून वेगात गाडी घेऊन जातो आहे. गाडीचालक बेपर्वाईने लेन बदलत गाडी चालवतानाचे दृश्य दिसत आहे. यादरम्यान त्याने एका धावत्या दुचाकीस्वाराससुद्धा धडक दिली आहे व तो थेट दुचाकीवरून खाली पडला. तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…VIDEO: उसाचा रस थेट कारमधील रसवंतीगृहामधून; व्यापाऱ्याचा अनोखा जुगाड, ग्राहकही पडले प्रेमात

व्हिडीओ नक्की बघा…

मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या वाहनचालकाने शेवटी कार थांबवल्यानंतर अनेक व्यक्तींनी लॉक केलेले दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना यश आलं नाही. पण, नंतर एका व्यक्तीने विटेने वाहनाची काच फोडली, दरवाजा उघडला आणि ड्रायव्हरला जबरदस्तीने बाहेर काढले. त्यानंतर इतर उपस्थितांनी सामील होऊन चालकाला खडेबोल सुनावले. व्हिडीओमध्ये दोन्ही बाजूंनी कारचे नुकसान झाले आहे. त्यावरून असं समजून येत आहे की, मद्यधुंद अवस्थेत त्याने अनेक वाहनांना धडक दिली असावी.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ Reddit ॲपवरून @Go to CarsIndia या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये त्याने तीन वाहनचालकांना धडक दिली आहे, असे नमूद करण्यात आले आहे. ही घटना पाहून नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये संताप व्यक्त केला आहे. काहींनी बाइकस्वाराचे कौतुक केले, तर काहींनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच काही युजर्सनी असे सुचवले की, त्यांनी कारच्या नंबर प्लेटचा फोटो काढून पोलिसांना कळवलं पाहिजे होतं ; असे म्हणताना सुद्धा दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.