देशातील विविध राज्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. त्यामुळं नागरिकांचं स्थलांतर करावं लागत आहे. विशेष उत्तर भारतात पावसानं थैमान घातलं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत्यूनंतरही मरणयातना संपेना याची प्रचिती येणारी ही घटना, मेल्यानंतर देखील मृत शरीराला अग्नी नशिब होत नाही हे फारच दुर्दैवी आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्यक्तीच्या पार्थिवावर कोरड्या नदीत अंत्यसंस्कार सुरु असताना अचानक पाण्याचा लोंढा आला. यावेळी जळत असलेले प्रेत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नेमकी कुठे घडली आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. या चितेला अग्नी देण्यासाठी सर्व जण उभे आहेत, मात्र अग्नी देताच नदीला पूर येतो आणि लोक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिता संपूर्ण जळण्याआधी पाण्यातून वाहून गेली.

अनेकांनी या व्हिडीओवर हळहळ व्यक्त केली आहे. इथं मृत्यूनंतरही मरणयातना संपेना, नशिबी असे कसे हे मरण, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचाकेक खाताना दहा वेळा विचार कराल! हा VIDEO पाहाल तर झोप उडेल, नागरिक संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळं मोठं नुकसान

हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळं राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. राज्याच्या अनेक भागात अजूनही पाऊस सुरूच आहे. या पावसाने कहर केला आहे. गेल्या काही वर्षांच्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर राज्यात आतापर्यंत सर्वाधिक नुकसान यावर्षी झालं आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या 28 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे 4985.68 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.