जंगलात सिंह, वाघ, चित्ता असे प्राणी आपली भूक भागवण्यासाठी छोट्या अशक्त, जनावरांवर हल्ला करतात. भारतात अनेक मोठी राष्ट्रीय उद्याने आहेत, जिथे जंगल सफारी केली जाते. एवढ्या मोठ्या उद्यानात अनेक वन्य प्राणी देखील आहेत, जिथे आपण त्यांना थेट पाहू शकतो. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वाघ जंगल सफारी करण्याऱ्या लोकांसमोर शिकार करतो. ही घटना कैमेऱ्यात कैद झाली आहे.

सफारी दरम्यान पाहिला थेट हल्ला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की जेव्हा काही लोक रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारी करण्यासाठी जीपच्या आत पोहोचले तेव्हा त्यांनी एक घटना पाहिली जी ते कधीही विसरणार नाहीत. सफारीच्या वेळी लोक दोन-तीन जीपमध्ये उभे राहून जवळच असलेल्या प्राण्यांकडे बघत होते, पण तेवढ्यात एक कुत्रा धावत आला आणि जीपच्या मागे लपला.

पुढे काय झालं?

मात्र, वाघाची नजर त्या कुत्र्यावरच राहिली. तिथून पळून जाण्यासाठी कुत्रा पुढे सरसावताच वाघाने मागून येऊन त्याला पकडले. भुकेने व्याकूळ झालेल्या वाघाने कुत्र्याला आपले भक्ष्य बनवले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जंगल सफारीला आलेल्या लोकांसमोर थेट शिकार होत होती, जी सर्वांनी पाहिली.

हा व्हिडीओ अनिश अंधेरियाने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वाघाने रणथंबोरच्या आत कुत्र्याला मारले. असे केल्याने ते कॅनाइन डिस्टेम्परसारख्या घातक रोगांना सामोरे जात आहे ज्यामुळे वाघांची संख्या काही वेळात नष्ट होऊ शकते. कुत्रे हा वन्यजीवांसाठी मोठा धोका बनला आहे. अभयारण्यांमध्ये त्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.’ त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनाही टॅग केले आहे.