रेल्वेस्थानकाबाहेर उभे असणारे रिक्षाचालक जास्त कमाई करण्यासाठी तीनपेक्षा जास्त प्रवाशांना रिक्षात बसवतात. रिक्षाचालकाच्या दोन्ही बाजूंना दोन प्रवासी, तर मागच्या सीटवर तीन, असे प्रवासी एक रिक्षातून प्रवास करतात. तीनपेक्षा जास्त जण रिक्षात बसल्यास अनेक प्रवाशांनाही अस्वस्थ वाटते. तसेच अनेकदा धक्काबुक्की होऊन रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यात वादसुद्धा होतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात जास्त प्रवासी बसल्यामुळे एक ई-रिक्षा पलटी होते.

व्हायरल व्हिडीओ दिल्लीचा आहे. रस्त्यावरून एक दुचाकी चालवणारा यूट्युबर त्याचा ब्लॉग शूट करीत असतो. तेव्हा त्याच्या मोबाइलमध्ये एक घटना रेकॉर्ड होते. जास्त संख्येने प्रवासी बसलेली एक ई-रिक्षा रस्त्यावरून जात असते. त्यात काही प्रवासी बसलेले असतात. बघता-बघता जास्त प्रवाशांच्या लोडमुळे रिक्षा मागे जमिनीवर पडते. त्यानंतर रिक्षाचालक खाली उतरतो आणि अडकलेल्या प्रवाशांना उठण्यास मदत करतो. व्हायरल होणारा हा मजेशीर व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

हेही वाचा…लिफ्टमधून कुत्र्याला नेणाऱ्या महिलेला माजी IAS ची मारहाण; नवऱ्याने घेतला बदला, घटनेचा VIDEO होतोय व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

प्रवाशांच्या लोडमुळे उलटी झाली रिक्षा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ई-रिक्षा प्रवाशांनी गच्च भरलेली असते. रिक्षाचालकाच्या बाजूला दोघे आणि मागच्या सीटवर तीन प्रवासी बसलेले असतात. अशा अतिवजनामुळे रिक्षा उलटी होते. तसेच रिक्षाचालक हवेत; तर प्रवासी जमिनीवर, असे गमतीशीर दृश्य पाहायला मिळते. प्रवासी रिक्षात अडकल्याचे पाहता आजूबाजूचे सगळेच जण धावत जाऊन प्रवाशांची मदत करतात आणि रिक्षा सरळ करून ठेवतात. काही प्रवासीसुद्धा घडलेली ही घटना पाहून हसताना दिसत आहेत आणि इथे व्हिडीओचा शेवट होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @hussain.therider या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. तसेच यूट्युबवर ब्लॉग शूट करीत होता. त्यामुळे त्याने या प्रकरणाचा पूर्ण व्हिडीओ त्याच्या यूट्युब अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच या व्हिडीओला यूट्युबरने ‘हेवी ड्रायव्हर’ (Heavy Driver) अशी कॅप्शन दिली आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून विविध मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. व्हिडीओ मजेशीर असला तरीही रिक्षाचालकाने जास्त प्रवासी रिक्षात बसवल्यामुळे ही घटना घडली. मोठी दुर्घटनादेखील होऊ शकली असती; पण सुदैवनाने तसे काही घडले नाही आणि वेळीच आजूबाजूचे लोक मदत करण्यास धावून आले.