Viral video: इंटरनेटवर सिंह, वाघ, सापांसारख्या जीवघेण्या प्राण्यांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. पण गरुडासारख्या पक्षाचा व्हिडीओ समोर आल्यावर अनेकांच्या नजरा खिळतात. कारण तीक्ष्ण नजर असलेला हा पक्षी हजारो फूट उंचीवरून खाली उडी मारतो आणि शिकार करतो. गरूड पक्षाने छोट्या प्राण्यांची शिकार केल्याचे व्हिडीओ याआधी आपण पाहिले असतील. परंतु, आता व्हायरल झालेल्या या व्हिडीओने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण एका छोट्याशा सशानं चक्क गरुडाला धूळ चारली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. ससा आणि गरुडामधील या घनघोर युद्धाचा शेवट पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.

ससा आपल्यावर हल्ला करेल याची गरुडालाही कल्पना नसते. जर तुम्ही हा व्हिडीओ पुढे बघितला तर तुमच्या लक्षात येईल की गरुडाने सशाला आपले भक्ष्य बनवण्याचा प्रयत्न करताच ससा गेम फिरवतो आणि गरुडावर हल्ला करतो.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक विशाल असा गरूड सशाची शिकार करण्याचा प्रयत्न करत होता. आता एवढासा ससा या विशाल गरुडासमोर नक्कीच फेल जाणार मात्र ससा असा काही डाव पलटवतो की तुम्हीही अवाक् व्हाल. गरूड प्रचंड वेगानं उडतो. शिवाय त्याचे डोळे देखील खूप तिक्ष्ण असतात. त्यामुळे तो अगदी आकाशातून सुद्धा आपलं भक्ष्य टिपू शकतो. पण या सशानं मात्र गरूडाला सुद्धा धडा शिकवला. गरूड जवळ येताच त्यानं उंच अशा उड्या मारल्या. त्यामुळे सशाला पकडणं गरूडाला शक्य झालं नाही. गरूड बराच वेळ प्रयत्न करत राहिलं पण ससा सुद्धा वाऱ्याच्या वेगानं पळून चकवा देत राहिला. शेवटी गरूडानं वैतागून सशाचा नाद सोडला आणि ते दुसरी शिकार करण्याच्या दिशेनं वळलं.. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यामध्ये कमकुवत शत्रू बलवान शत्रूवर मात करतो. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे कोणालाच कमी समजू नका, कधी डाव उलटेल हे सांगू शकत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हेल्मेटनं मृत्यू रोखला; भर रस्त्यातला अपघाताचा VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका!

अखेर या लढाईत गरुड माघार घेतो. व स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु करतो. पण त्याला काही यश मिळत नाही. इंटरनेटवर सापांचे, वन्य प्राण्यांचे अनेक थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. पण गरुड पक्षाने उंचावरून केलेली शिकार आणि त्यानंतर सशानं शिकवलेला धडा असे दृष्य क्वचितच पाहायला मिळतात. हा व्हिडीओ chatsuccesshub या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. यावर युजर्स कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… “एखाद्याने शत्रूला कधीही हलके समजू नये.” दुसऱ्या युजरने लिहिले…”गरीब गरुड, आज त्याचे नशीब चांगले नव्हते.