Satyendra Nath Bose Google Doodle: गुगलने गुगल डूडल बनवून भारताचे महान शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांचा गौरव केला आहे. सत्येंद्र नाथ बोस, १९२० साली त्यांनी केलेल्या क्वांटम फिजिक्सवरील संशोधनासाठी जगभरात ओळखले जातात. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन देखील त्यांच्या क्वांटम सिद्धांताचे चाहते होते. यावरून तुम्ही सत्येंद्र नाथ बोस यांच्या कारकिर्दीचा अंदाज लावू शकता. असे असूनही सत्येंद्र नाथ बोस यांना भारतात हवा तसा सन्मान मिळू शकला नाही. त्यांनी लिहिलेले शोधनिबंधही देशातील कोणत्याही जर्नलमध्ये समाविष्ट केले गेले नाहीत.

महान भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांचा जन्म १ जानेवारी १८९४ रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ बोस हे ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीच्या अभियांत्रिकी विभागात काम करत होते. सत्येंद्र नाथ बोस हे त्यांच्या ७ भावंडांपैकी सर्वात मोठे होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण नादिया जिल्ह्यातील बडा जागुलिया गावात झाले. पुढील शिक्षणासाठी ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गेले. यानंतर प्रेसिडेन्सी कॉलेजमधूनच १९१५ मध्ये त्यांनी अप्लाइड मॅथ्समधून एमएससी पूर्ण केले. त्यानंतर १९१६ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या सायन्स कॉलेजमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून प्रवेश घेतला आणि थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा अभ्यास सुरू केला.

आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप भारतात; जाणून घ्या काय आहेत याची वैशिष्ट्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वर्षांपूर्वी हिग्ज बोसॉन म्हणजेच गड कणाचा शोध लागला होता. या शोधानंतर सत्येंद्र नाथ बोस प्रसिद्धीच्या झोतात आले. हिग्ज बोसॉनमध्ये हिग्ज हे नाव ब्रिटीश शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांच्या नावावर ठेवण्यात आले होते तर बोसॉनचे नाव भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. ते भौतिकशास्त्रज्ञ तसेच गणितज्ञ होते. सत्येंद्र नाथ बोस हे बोस-आईन्स्टाईन सांख्यिकी आणि बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट सिद्धांतासाठी देखील ओळखले जातात. बोस यांचा शोध क्वांटम भौतिकशास्त्राला एक नवीन दिशा देतो.