Viral video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका काकूंनी खतरनाक डान्स केला आहे.
‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. इन्स्टाग्रामवर तर शेकडो रील्स पाहायला मिळतात, ज्यामध्ये लोक ‘एक नंबर’ डान्स करताना झळकत आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक तरुण मुलगी स्टेजवर डान्स करताना दिसतेय. दरम्यान, तिचा डान्स पाहून एका महिलेचा इतका उत्साह वाढतो की ती थेट स्टेजवर उडी मारून डान्स करू लागते.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कार्यक्रमात या काकूंनी एक नंबर तुझी कंबर… या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. डोळ्यावर गॉगल लावून या काकी एकापेक्षा एक भारी एक्स्प्रेशन देत आहेत. या व्हिडिओमधल्या काकूंच्या डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स पाहिल्यानंतर ते अनेकांना पसंत पडत आहे. महिलेच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. ही महिला इतकी सुंदर नाचतेय, की त्यावरून तुमची नजर हटणार नाही. तिचा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडलाय. काकूंची ही अदा पाहून सर्वच फिदा झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर विचित्र व्हिडीओची कमी नाही. लोक वेगवेगळे व्हिडीओ इथे शेअर करत असतात. जे डान्स किंवा एखाद्या टॅलेंटशी संबंधीत असतात. शिवाय माहिती देणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ x.bakloolwala नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.