“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात अल्पवाधित लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील आपल्या पत्नीसहीत नुकतेच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. आपल्या गावरान आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे मागील काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झालेल्या शहाजीबापूंनी या कार्यक्रमात अगदी आपल्या पत्नीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत उखाणा घेतल्याचं पहायला मिळालं. या उखाण्याला कार्यक्रमाचे सुत्रसंचालक निलेश साबळेंपासून ते स्वप्नील जोशीनेही टाळ्या वाजवत दाद दिली. विशेष म्हणजे हा उखाणा ऐकून शहाजीबापूंच्या पत्नीही हसून लाजल्याचं पहायला मिळालं.

नक्की पाहा >> Photos: “पाया पडतो, भांडू नको…”; स्वत:च्याच लग्नात शहाजीबापूंनी पत्नीला सोन्याऐवजी दिलेले पितळ्याचे दागिने; कारण…

राजकीय आखाड्यामध्ये एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या राजकारण्यांची वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न चला हवा येऊ द्याच्या आजच्या म्हणजेच १८ जूलैच्या भागामध्ये पहायला मिळणार आहे. या विशेष भागाच्या जाहिरातीमध्ये शहाजीबापू पाटील यांच्यासोबतच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्या पतीसोबत सहभागी झाल्याचं दिसत आहे. झाडी, डोंगार, हाटीलमुळे लोकप्रिय झालेल्या शहाजीबापू पाटील यांच्या याच संवादाच्या अवतीभोवती थुकरटवाडीतील स्कीट रचण्यात आल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> भविष्यात शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील का?; शहाजीबापू म्हणाले, “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य हे सर्व आमदारांच्या…”

विशेष म्हणजे यावेळेस शहाजीबापूंनी खास उखाणाही घेतल्याचं पहायला मिळालं. मातीशी नाळ जोडलेला नेता ही ओळख जपणारा उखाणा घेताना शहाजीबापूंनी सांगोल्यातील नदीच्या नावाचं यमक आपल्या पत्नीचं नाव घेताना जुळवल्याचं पहायला मिळालं. पत्नी रेखाचं नाव घेताना शहाजीबापूंनी, “माझ्या दुष्काळाला पाणी देण्याऱ्या नदीचं नाव आहे माण अन् रेखा माझी जान” असा खणखणीत उखाणा घेतला.

नक्की वाचा >> ‘झाडी, डोंगार, हाटील’ने सारेच झाले इम्प्रेस पण शहाजीबापूंनी घरात पाऊल ठेवताच पत्नी म्हणाली, “काय ते बोलून राहीला डोंगार बिंगार, नीट…”

हा उखाणा ऐकून रुपाली ठोंबरेंसहीत किशोरी पेडणेकर यांनाही हसू आलं. तर स्वप्नील जोशीने ‘एक नंबर’ असं म्हणत या उखाण्याला दाद दिल्याचं पहायला मिळालं. या कार्यक्रमाचा हा विशेष भाग १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

नक्की पाहा >> Video: “पवारांसोबत गेलो तर…”, ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदाराची तुफान फटकेबाजी; एकनाथ शिंदेंनाही हसू अनावर

शहाजी बापू गुवाहाटीमधून सांगोल्यामध्ये परतल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर रेखा यांनी उखाणा घेतला होता. “असेल तिथे मुलीनं नम्रतेनं वागावे, शहाजीबापूसारखे पती मिळाल्यावर देवाजवळ आणखी काय मागावे,” असं आपल्या आमदार पतीचं नाव घेताना रेखा यांनी म्हटलं होतं.  

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde rebel mla shahaji bapu patil ukhana for wife rekha in chala hawa yeu dya scsg
First published on: 18-07-2022 at 16:27 IST