असं म्हणतात की, ”वयं हा फक्त एक आकडा आहे.” या म्हणीचा तुम्ही कधी अर्थ समजून घेतला आहे का? नसेल तर मग हा व्हिडिओ पाहा. एखाद्याला आयुष्याचा आनंद घेता असेल तर जगातील कोणतीच गोष्ट त्याला अडवू शकत नाही मग भलेही त्या व्यक्तीचं वय काहीही असो. तुम्हाला प्रत्येक क्षण आनंद आणि उत्साहात जगायचा असेल तर तुम्ही या आजीबाईंकडून प्रेरणा घेऊ शकता. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरलं होत आहे ज्यामध्ये एका आजीबाईंनी जबरदस्त डान्स केला आहे. एखाद्या तरुणाला लाजवेल असा डान्स या वृद्ध महिलने केला आहे. आजीबाईंचा उत्साह पाहून लोक आश्चर्यचकीत झाले आहेत.

हेलनच्या गाण्यावर थिरकल्या आजीबाई

हा व्हिडिओ मनीषहरसिन्तीव (manishakharsyntiew)नावाच्या अकांउटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ आतापर्यंत 19 लाखांपेक्षा जास्त लोकांना पाहिला आहे.व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक आजी ”पिया तू अब तो आजा” या गाण्यावर बिनाधास्त डान्स करताना दिसतील. ”पिया तू अब तो आजा” हे गाणे प्रसिद्ध गायिका आशा भोंसले यांना गायलं होतं आणि तर अभिनेत्री हेलन यांनी त्यावर अविस्मरणीय आणि अप्रतीम डान्स केला होता. आजीबाईंचा हा डान्स तुम्हाला हेलनच्या डान्सची नक्कीच आठवणकरुन देईल. वय झालेलं असूनही आजीबाईंचा उत्साह पाहून सर्वांनाच त्यांचे कौतूक वाटत आहे. हा व्हिडिओ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हसू घेऊन येत आहे. हा व्हिडिओ खरचं प्रेरणादायी आहे.

actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
Bollywood actress Kriti Sanon like do you also feel not wanting people around if your mood is off
क्रिती सेनॉनप्रमाणे तुम्हालाही मूड ऑफ असेल तेव्हा लोक जवळ नको असतात? जाणून घ्या, भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?
Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
a man sings a amazing song kya hua tera wada
“नशा दौलत का ऐसा भी क्या…” व्यक्तीनं गायलं सुरेख गाणं, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकांना प्रेमात धोका मिळाला..”
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’

हेही वाचा – जपानच्या राजदुतांना भारतीय खाद्यपदार्थांची लागली चटक! पाणीपुरीनंतर आता लिट्टी-चोखावर मारला ताव, पाहा photo

आजीबाईंचं सर्वांनी केलं कौतूक

व्हिडिओवर लाखो लोकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहे. लोकांनी आजींच्या डान्स मुव्हज आणि उत्साहाचे भरभरून कौतूक केले आहे. एकाने लिहले की, ”कौतूक करायाला शब्दच नाहीत”. तर दुसऱ्याने लिहले की, ”या वयातही काय उत्साह आहे”, तिसऱ्या यूजरने लिहिले, ”मला असंच जगायचं आहे.”

हेही वाचा – हिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार? ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय?

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा