वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहे. इलेक्ट्रिक कार, मोटारसायकल, ट्रेन आधीच बाजारात आल्या आहेत, पण आता लवकरच तुम्हाला इलेक्ट्रिक विमान बघायला मिळणार आहे. एका अमेरिकन स्टार्टअपने २०२७ पर्यंत १००सीट असलेलं इलेक्ट्रिक विमान तयार करण्याची आशा व्यक्त केली आहे.

कसं असेल हे विमान?

यूएस स्टार्टअप राइट इलेक्ट्रिक इंक (wright electric inc) मुळत:बीएई सिस्टीम्सने तयार केलेल्या बीएई १४६ प्रादेशिक विमानातील चार जेट इंजिनच्या जागी इलेक्ट्रिक मोटर्स परत आणण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे ते शून्य-कार्बन उत्सर्जन विमानात बदलले जाऊ शकते. कंपनीने सांगितले की, ही १००सीट असलेलं विमान १ तास किंवा ४६० मैल उडू शकतं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे विमान फ्रँकफर्ट-पॅरिस, न्यूयॉर्क-बोस्टन, पॅरिस-लंडन, रिओ डी जनेरियो-साओ पाउलो यांसारख्या जवळच्या शहरांच्या अंतराचा प्रवास करण्यासाठी योग्य असेल.

( हे ही वाचा: “एक जग, एक सूर्य, एक मोदी…”, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचं केलं हटके कौतुक! व्हिडीओ व्हायरल! )

एअरबस एसई सारखे विमान निर्माते २०३५ पर्यंत इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनवर चालणारी विमाने बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीचे सीईओ जेफ्री एंग्लर म्हणाले की, ग्राहक कार्बनमुक्त पर्यायांची मागणी करत आहेत आणि आम्ही त्यांना हा पर्याय देऊ इच्छितो.

( हे ही वाचा: रजनीकांतचा ‘अन्नतथे’ मुंबईच्या अरोरा थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही; जाणून घ्या कारण )

लॉस एंजेलिस-आधारित राइट इलेक्ट्रिक इंकची स्थापना २०१६ साली झाली. २०३० पर्यंत ८०० मैलांच्या रेंजसह १८६ सीटर कार्बन-फ्री इंधन असलेले विमान सादर करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.