हत्तीच्या पिल्लांचा मस्ती करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मस्ती करणाऱ्या या छोट्या हत्तींचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणर नाही.
या व्हिडिओमध्ये नदीच्या किनारी उभे असलेले दोन छोटे हत्ती दिसतायेत. त्यातील एक हत्ती पाण्यापासून जरा लांब उभा राहिलेला दिसतोय. पण, दुसरा खोडकर हत्ती हळूहळू लांब उभ्या असलेल्या हत्तीच्या मागे येतो आणि त्याला मागून जोरात धक्का देऊन पाण्यात ढकलतो. त्यानंतर पडलेल्या या हत्तीची झालेली फजिती बघायलाही तो खोडकर हत्ती पाण्याजवळ जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
In mischievous play elephant calves are unbeatable pic.twitter.com/wflakg7skQ
— Susanta Nanda IFS (@susantananda3) June 25, 2020
मस्ती करणाऱ्या या छोट्या हत्तींचा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. काल हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला असून आतापर्यंत 62 हजारांहून जास्त जणांनी हा व्हिडिओ बघितला आहे.
