Elephant Crushed man video viral: हत्तीला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानलं जातं. हत्तींचं वजन हजारो किलोंमध्ये असतं. हा प्राणी आपल्या पायाखाली काहीही दाबून त्याचा विनाश करू शकतात. अनेकदा हा प्राणी माणसांसोबतही राहातो, मात्र शेवटी तो आहे जंगलीच. त्यामुळे हा प्राणी जंगलात राहिलेलंच अधिक चांगलं असतं. जंगलातून प्रवास करत असताना अनेक हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागतो. अशातच वाघ, सिंह, हत्तीसारखे प्राणी समोर दिसल्यावर अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिसाळलेल्या हत्तीने फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या मागे पळत त्याला पायाखाली चिरडलं आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
तामिळनाडूमधील बांदीपूर अभयारण्यात फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माणसावर हत्तीने हा हल्ला केलाय. तामिळनाडूहून कर्नाटककडे जाणाऱ्या रस्त्यावर बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातून गाडी चालवत असताना हा प्रकार घडला असल्याच सांगत एका व्यक्तीनं हा व्हिडीओ आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, रस्त्याच्या मधोमध जाणाऱ्या ट्रकमधून उचललेले गाजर हत्ती शांतपणे खात होता, तर गाड्यांची एक लांब रांग धीराने हत्ती आपल्या वाटेने पुन्हा जंगलात जाईल याची वाट पाहत होती. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पांढऱ्या कारमध्ये असलेल्या साक्षीदाराच्या मते, संबंधित व्यक्तीने हत्तीचा जवळून फोटो काढण्यासाठी फ्लॅश असलेल्या कॅमेऱ्याचा वापर केला होता. अचानक प्रकाश पडल्याने प्राणी घाबरला आणि हत्ती त्या व्यक्तीच्या मागे पळू लागले अखेर हत्तीनं हल्ला सुरू केला आणि त्या व्यक्तीला आपल्या पायाखाली चिरडले.ही घटना वन्यजीव अभयारण्याच्या नियमांचे पालन करण्याची आणि अशाप्रकारे चूक न करण्याचा धडा देते.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक हत्ती रस्त्यावर दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती फोटो काढण्यासाठी हत्तीच्याजवळ जातो आणि तिथेच घात होतो. त्याच्या मोबाईलची फ्लॅश सुरु होते आणि हत्ती पिसाळतो. हत्ती व्यक्तीच्या मागे धावतो आणि लाथ मारतो नंतर त्याला पायाने चिरडले. हे सर्व अवघ्या दहा ते पंधरा सेकंदात घडले आणि या व्यक्तीला वाचवण्याची संधी कोणालाही मिळाली नाही.
पाहा व्हिडीओ
हिंस्र प्राण्यांचा मुक्तसंचार वाढला असून प्राणी माणसांवर हल्ला करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ thales_yoga नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.