अनेक ह्रदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि ते पाहून मन सुखावून जातं. अनेक व्हिडीओ इतके चांगले असतात की ते पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. सध्या इंटरनेटवर हत्तींचा एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हत्ती नेहमी आपल्या कुटूंबासह कळपात राहतात आणि त्यांच्यावर काही धोका निर्माण झाला तर मानवाप्रमाणे सर्व हत्ती एकत्र येऊन सामना करतात. तुम्ही कधी हत्तीण तिच्या बाळाला जन्म देताना पाहिलंय का? क्वचितच कुणी हा क्षण पाहिला असेल. सोशल मीडियावर सध्या हत्तीण तिच्या बाळाला जन्म देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत होतोय. हत्तीणीने बाळाला जन्म दिल्यानंतर कळपाने ज्या पद्धतीने हा क्षण साजरा केलाय ते पाहून तुम्ही सुद्धा प्रसन्न व्हाल.

घरात बाळाचा जन्म झाल्यावर नुसता आनंदी आनंद पसरतो. मग तो माणूस असो प्राणी…हा क्षण प्रत्येक आईच्या जीवनातला अविस्मरणीय क्षण बनून जातो. माणसांप्रमाणेच हत्तींनी सुद्धा त्यांच्या कुटुंबात आलेल्या नव्या पाहूण्याचं स्वागत केलंय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हत्तीण बाळाला जन्म देत असून त्याच्या आजूबाजूला हत्तींचा कळप असल्याचे दिसत आहे. बाळ जमिनीवर पडताच हत्तीण त्याला हाताळते आणि सांभाळते. यानंतर आजूबाजूला उभे असलेले बाकीचे हत्तीही त्याच्याकडे येतात. हत्तींचा कळप आईभोवती उभा असतो आणि मुलाच्या जन्माच्या वेळी ते उत्साहित झालेले स्पष्टपणे दिसतात. पाय शोधण्यासाठी धडपडणाऱ्या बाळाचे सुरुवातीचे क्षणही व्हिडीओमध्ये टिपण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मसाई मारा नॅशनल पार्कचा आहे. हा व्हिडीओ गॅब्रिएल कोमो नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर तो बघता बघता तो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला ७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. “केनियातील मसाई मारा रिझर्व्हमध्ये हत्तीने बाळाला जन्म दिला.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : दे टपाटप! भर मंडपात नवरा-नवरीमध्ये तुफान मारामारी, पार जमिनीवर लोळेपर्यंत रंगलं WWE

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नाग-नागिणीची जोडी जेव्हा रोमॅंटिक होते… पाहा हा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही युजर्सना हत्ती कसे जन्म देतात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एका युजरने विचारले, “आजूबाजूचे सर्व हत्ती का आले आहेत हे कोणाला माहीत आहे का? ही वाईट गोष्ट आहे की चांगली?” दुसर्‍याने लिहिले, “गरीब बाळ डोंगरावर जन्माला येत आहे आणि खाली पडत आहे. विशेष म्हणजे जन्म देण्यासाठी आई झोपत नाही.”