सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये प्राण्यांचे वेगवेगळे रूप दाखवणारेही काही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक गोंडस व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती पिल्लाला चढावरून कसे उतरायचे हे दाखवत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हत्तींचा कळप चालत कुठेतरी जात असल्याचे दिसत आहे. या रस्त्यात थोड्या उंचवट्यासारख्या भाग येतो. त्यावरून खाली उतरणे हत्ती हा बलाढ्य प्राणी असल्याने ते जरा कठीण जाते. त्यामुळे यावरून खाली कसे उतरायचे हे हत्ती पिल्लाला समजावत पाय टेकवत दाखवत आहे. हत्ती तिथून उतरून पुढे येतो, मात्र पिल्लू दाखवल्याप्रमाणे न करता चक्क त्यावर झोपून खाली उतरते. हा गोंडस प्रकार पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
व्हायरल व्हिडीओ:
हत्तीच्या पिल्लाच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली असुन, या व्हिडीओला १ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.