रॅम्पवर मॉडेल, अभिनेत्री, अभिनेते किंवा सेलिब्रेटिंना कॅटवॉक करताना तुम्ही पाहिलं असेल. त्यांचा कॅटवॉक चर्चेतही असतो. पण सध्या सोशल मीडियावर एका हत्तीच्या झालीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. हत्तीच्या चालीचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही कॅटवॉक विसराल. भारतीय वनसेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटवर हत्तीच्या चालीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

कॅटवॉक जास्त लोकप्रिय आहे किंवा हत्तीची चाल कमी लोकप्रिय आहे, असं कॅप्शन यावर सुसंता नंदा यांनी दिलं आहे. या व्हिडिओत हत्ती आपल्या मस्तमगन धुंतीत चालत असल्याचे दिसतेय. हत्ती तसा संथ चालीने चालणारा प्राणी. मात्र या व्हिडीओत तो खूप भन्नाट आणि वेगळ्या पद्धतीने चालत असल्याचे दिसतेय. हत्ती खूप आनंदात आहे आणि एका विशिष्ट स्टाइलने तो चालत आहे.


अवघ्या २० सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. मात्र तो पाहिल्यानंतर मनालाही खूप प्रसन्नता वाटते. या व्हिडिओला आतापर्यंत १७ हजारांपेक्षा जास्त लाइक आहेत. तर दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनीही बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.